India vs USA LIVE : बुमराहसह 4 खेळाडूं OUT, मोहम्मद सिराज IN, यूएसएविरुद्ध सामन्यात सूर्याचा धडाकेबाज निर्णय! पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11
IND vs USA T20 World Cup Match : भारत आणि यूएसए यांच्यातील टी-20 विश्वचषक 2026 मधील तिसरा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे.

IND vs USA T20 World Cup Match : भारत आणि यूएसए यांच्यातील टी-20 विश्वचषक 2026 मधील तिसरा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. यूएसएच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या प्लेइंग -11 मध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज संजू सॅमसन यांना या सामन्यासाठी अंतिम संघातून वगळण्यात आले आहे. बुमराहसारख्या प्रमुख गोलंदाजाला विश्रांती देण्यात आल्याने चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, तर संजू सॅमसनच्या अनुपस्थितीमुळेही चर्चांना उधाण आलं आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
दरम्यान, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, वॉशिंग्टन सुंदर आणि संजू सॅमसन टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाहीत. बुमराहची तब्येत ठीक नाही. शुक्रवारी हर्षित राणाची जागा घेणाऱ्या मोहम्मद सिराजला त्यांच्या जागी स्थान देण्यात आले आहे.
यूएसए संघात भारतीय मूळ असलेल्या खेळाडूंची मोठी फौज आहे, त्यामुळे हा सामना केवळ औपचारिक न राहता रंगतदार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडले असून, त्यांच्या जागी अनुभवी मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
वानखेडे स्टेडियम पिच रिपोर्ट
वानखेड्याची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. येथे सहसा हाय-स्कोअरिंग सामने पाहायला मिळतात. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो, कारण येथे मोठं लक्ष्यही सहज पाठलाग करता येतं. संध्याकाळी दव असण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाची प्लेइंग-11 : ईशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
Presenting #TeamIndia's Playing XI for our opening game 🙌
— BCCI (@BCCI) February 7, 2026
Updates ▶️ https://t.co/Rlm2ARPnOV#MenInBlue | #T20WorldCup | #INDvUSA pic.twitter.com/NwiHkAvNbg
टी-20 वर्ल्ड कपसाठी यूएसए संघ
मोनांक पटेल (कर्णधार), अँड्रीज गौस (यष्टीरक्षक), सैतेजा मुक्कमल्ला, शायन जहांगीर, मिलिंद कुमार, शुभम रंजने, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसिन, अली खान, नोस्तुश केनजिगे, सौरभ नेत्रावळकर, शॅडली व्हॅन शल्कविक, शेहान जयसूर्या, जसदीप सिंग, संजय कृष्णमूर्ती.
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर.





















