IND vs SA Final Live Streaming : फ्री, फ्री, फ्री.... येथे फुकटात पाहू शकता भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम महामुकाबला, जाणून घ्या सविस्तर माहिती
IND vs SA Women's World Cup final Live Streaming : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला वर्ल्ड कप 2025 चा फायनल सामना नेमका कधी, कुठे आणि किती वाजता खेळला जाणार आहे?

Women’s World Cup 2025 Final, India vs South Africa : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीचं तिकीट आपल्या नावावर केलं. आता भारताचा सामना फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. प्रोटियाज महिलांनी पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.(INDW vs SAW Live Streaming Details)
यावेळी महिला वर्ल्ड कपला नवा विजेता मिळणार आहे, कारण भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ पहिल्यांदाच विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे अंतिम सामना चुरशीचा आणि रोमांचक होण्याची शक्यता आहे. पाहूया, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला वर्ल्ड कप 2025 चा फायनल सामना नेमका कधी, कुठे आणि किती वाजता खेळला जाणार आहे?
कधी आणि कुठे होणार सामना? (INDW vs SAW Women’s World Cup Final Venue)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला वनडे वर्ल्ड कप 2025 चा अंतिम सामना रविवार 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा ऐतिहासिक सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. याच मैदानावर भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर विक्रमी विजय मिळवला होता. सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल, तर 2.30 वाजता टॉस पार पडेल. अंतिम सामन्यासाठी स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं असणार, अशी अपेक्षा आहे.
दोन्ही संघांसाठी इतिहास रचण्याची संधी
भारतीय महिला संघ तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी 2005 आणि 2017 मध्ये भारताने अंतिम फेरी गाठली होती, पण दोन्ही वेळा थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. तर, दक्षिण आफ्रिका महिला संघ पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचला आहे. दोन्ही संघांना पहिल्यांदा विश्वविजेते होण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत आणि इतिहास रचण्यासाठी सज्ज आहेत.
सामना कुठे पाहता येईल? (INDW vs SAW Live Telecast Where to Watch)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला वर्ल्ड कप 2025 चा फायनल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच, चाहत्यांना हा सामना जिओहॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर मोफत लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येईल.
भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, उमा छेत्री, शेफाली वर्मा.
दक्षिण आफ्रिका संघ - लॉरा वोल्वार्ड (सी), अयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, मारिझान कॅप, तझमिन ब्रिट्स, सिनालो जाफ्ता, नॉनकुलुलेको मलाबा, ॲनेरी डेर्कसेन, ॲनेके बॉश, मसाबता क्लास, सुने लुस, कराबो मेसो, तुमी सेखुखुने, नोंदुमिसो शांगासे.
















