IND vs PM XI Warm-Up match day 1 play has been abandoned : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ आजपासून (30 नोव्हेंबर) पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय डे-नाईट सराव सामना खेळणार होता. 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पिंक बॉल कसोटीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून हा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 


मात्र, पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे वाहून गेला आणि नाणेफेक न होता खेळ रद्द करण्यात आला. कॅनबेरामध्ये भरपूर पाऊस झाला आणि बऱ्याच प्रतीक्षेनंतर पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.






कॅनबेरामध्ये आज मुसळधार पाऊस पडला आणि त्यासंबंधीचे अपडेट्स सोशल मीडियावर सतत मिळत होते. अशा स्थितीत खेळ होण्याची शक्यता कमीच दिसत होती. सामन्याचा पहिला दिवस भारतीय वेळेनुसार सकाळी 9:10 वाजता सुरू होणार होता, परंतु नंतर प्रतीक्षा सुरूच राहिली आणि बीसीसीआयने 1:28 वाजता ट्विट करून पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्याची माहिती दिली. उद्या म्हणजेच रविवारी सकाळी 9:10 वाजता खेळ होणार असून त्यापूर्वी नाणेफेक सकाळी 8:40 वाजता होणार असल्याचेही सांगण्यात आले.


आता उद्या फक्त एक दिवस आल्यामुळे टीम इंडिया आणि पंतप्रधान X1 यांच्यात बीसीसीआयने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या दिवशी 50-50 षटकांचा सामना खेळवला जाईल. म्हणजेच टीम इंडियाला 50 षटकांची फलंदाजी आणि 50 षटके टाकण्याची संधी मिळेल, जेणेकरून संपूर्ण संघाला गुलाबी चेंडूने सराव करेल.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 5 कसोटी सामन्यांची खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला. आता मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल जो पिंक टेस्टने खेळवला जाईल. गेल्या वेळी पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36 रन्सवर ऑलआऊट झाली होती. अशा परिस्थितीत यावेळी भारतीय संघ आपल्या तयारीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. 


हे ही वाचा -


Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?