एक्स्प्लोर

Ind vs Pak Women's Asia Cup Live Streaming : भारत-पाकिस्तान सामन्याचा काऊंटडाऊन सुरू! कधी, कुठे अन् LIVE कसा पाहाल? जाणून घ्या A टू Z

India vs Pakistan Women's Asia Cup 2026 Live Streaming : महिला आशिया कप 2026 स्पर्धेत भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीतील स्थान आधीच निश्चित केलं आहे.

India vs Pakistan Women's Asia Cup 2026 Live Streaming : महिला आशिया कप 2026 स्पर्धेत भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीतील स्थान आधीच निश्चित केलं आहे. आता साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. शनिवारी 5 सप्टेंबरला होणाऱ्या या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. भारताची आतापर्यंतची कामगिरी पाहता टीम इंडिया या सामन्यात प्रबळ दावेदार मानली जात आहे. पाकिस्तानला मात्र भारताविरुद्ध चांगली कामगिरी करायची असेल, तर फलंदाजीत मोठी सुधारणा करण्याची गरज आहे.

स्मृती-शेफाली वर्माचा धडाका कायम राहणार?

भारताच्या सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने विक्रमी शतक झळकावत स्पर्धेतील इतर संघांना धोक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धही भारतीय सलामीची जोडी कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचं लक्ष असेल. प्रतिका रावल, रिचा घोष आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांना मात्र मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचं मोठ्या खेळीत रूपांतर करण्याची संधी असेल.

पाकिस्तानची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी

दुसरीकडे पाकिस्तानच्या फलंदाजीने आतापर्यंत निराशा केली आहे. थायलंडविरुद्धच्या मागील सामन्यातही पाकिस्तानने पॉवरप्लेमध्ये तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 119 धावांचं आव्हान यशस्वीपणे बचावलं असलं, तरी भारतासारख्या मजबूत संघाविरुद्ध अशी कामगिरी पुरेशी ठरणार नाही. भारताच्या मजबूत फलंदाजी आणि गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांची खरी कसोटी लागणार आहे.

IND vs PAK सामना कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार

महिला आशिया कप 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल.

टीव्हीवर सामना कुठे पाहता येणार?

महिला आशिया कप 2026 मधील सामन्यांचं भारतातील थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर केलं जाणार आहे. त्यामुळे टीव्हीवर चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थेट आनंद घेता येईल.

मोबाईलवर LIVE सामना कसा पाहाल?

डिजिटल माध्यमातून सामना पाहणाऱ्या चाहत्यांसाठी SonyLIV अॅप आणि वेबसाइटवर भारत-पाकिस्तान सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

हे ही वाचा -

BCCI Action 62 Players : BCCI ने रोहितसह 62 खेळाडूंवर घातली बंदी; वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूचाही समावेश, नेमकं प्रकरण काय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 5th T20 : इशान किशानचा 'मॉन्स्टर सिक्स'; थेट स्टेडियमच्या बाहेर चेंडू, 2 पंच धावत आले, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनीही डोळे फिरवले, VIDEO
इशान किशानचा 'मॉन्स्टर सिक्स'; थेट स्टेडियमच्या बाहेर चेंडू, 2 पंच धावत आले, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनीही डोळे फिरवले, VIDEO
IND vs WI 5th T20 : 6, 4, 6, 1, 6...पावसाने वादळाला थांबवलं, गोलंदाजांना नमन धीरने रडवलं; 400 च्या स्ट्राईक रेटने धावा, वेस्ट इंडिजला झोडून काढलं!
6, 4, 6, 1, 6...पावसाने वादळाला थांबवलं, गोलंदाजांना नमन धीरने रडवलं; 400 च्या स्ट्राईक रेटने धावा, वेस्ट इंडिजला झोडून काढलं!
IND Vs WI 5th T20 Update : निर्णायक सामन्याचा निकाल लागला! नमन धीर-इशान किशननं मैदान गाजवलं, अन्... भारत-वेस्ट इंडिजच्या पाचव्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
निर्णायक सामन्याचा निकाल लागला! नमन धीर-इशान किशननं मैदान गाजवलं, अन्... भारत-वेस्ट इंडिजच्या पाचव्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs WI 5th T20 : बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Embed widget