Women’s Asia Cup IND vs PAK Free Streaming Details : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला आशिया कप 2026 मधील महामुकाबला आज, 5 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी दमदार राहिल्याने या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. महिला आशिया कप 2026 मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यांत विजय मिळवला आहे. भारताने 30 ऑगस्ट रोजी थायलंडचा, तर 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँगचा पराभव केला.
दुसरीकडे, पाकिस्तानने आतापर्यंत एकच सामना खेळला आहे. 1 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने थायलंडवर 35 धावांनी शानदार विजय मिळवला. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे आजचा सामना गुणतालिकेच्या दृष्टीने निर्णायक नसला तरी दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची लढत असणार आहे.
भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे? (India vs Pakistan Womens Asia Cup 2026 Live Streaming)
भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघांमधील हा हाय-व्होल्टेज सामना आज, 5 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल.
IND vs PAK LIVE कुठे पाहणार?
भारत-पाकिस्तान महिला आशिया कप सामन्याचं थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क च्या चॅनेल्सवर केलं जाणार आहे. चाहत्यांना हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेता येईल. मोबाईल किंवा इतर डिव्हाइसवर सामना पाहायचा असल्यास सोनीलिव्ह अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
भारत-पाकिस्तान सामना फ्रीमध्ये कसा पाहायचा?
ज्या चाहत्यांकडे डीडी फ्री डिश आहे, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. भारत-पाकिस्तानचा हा सामना डीडी स्पोर्ट्सवर लाइव्ह पाहता येणार आहे. डीडी फ्री डिशवरील चॅनेल्स पाहण्यासाठी कोणताही मासिक शुल्क आकारला जात नाही. त्यामुळे तुमच्याकडे डीडी फ्री डिश कनेक्शन असल्यास डीडी स्पोर्ट्सवर भारत-पाकिस्तानचा महामुकाबला मोफत पाहता येईल.
हे ही वाचा -
