IND vs PAK Asian Games 2026 Final : रोमांचक सामन्यात श्रेयसच्या ब्रिगेडने मारलं जपानचं मैदान! पाकिस्तानला 19 धावांनी हरवत जिंकलं सुवर्णपदक
India vs Pakistan Live Update Asian Games 2026 Final : जेव्हा कधी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना असतो, तेव्हा उत्साह शिगेला पोहोचतो.
Advertisement
किरण महानवरLast Updated: 03 Oct 2026 01:31 PM
पार्श्वभूमी
India vs Pakistan Gold Medal Match Asian Games 2026 Final : जेव्हा कधी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना असतो, तेव्हा उत्साह शिगेला पोहोचतो. हे दोन देश यापूर्वी आयसीसी स्पर्धा,...More
India vs Pakistan Gold Medal Match Asian Games 2026 Final : जेव्हा कधी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना असतो, तेव्हा उत्साह शिगेला पोहोचतो. हे दोन देश यापूर्वी आयसीसी स्पर्धा, आशिया कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमनेसामने आले आहेत. यावेळी, दोन्ही संघ आशियाई खेळांच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत, त्यामुळे ते सुवर्णपदकाच्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतील. भारत-पाकिस्तान अंतिम सामना कधी आणि कुठे होणार?भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेचा अंतिम सामना शनिवार, 3 ऑक्टोबर रोजी जपानमधील निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्क मैदानावर खेळवला जाणार आहे.सामना किती वाजता सुरू होईल?नाणेफेक : सकाळी 9:30 वाजता (भारतीय वेळेनुसार)सामन्याची सुरुवात : सकाळी 10:00 वाजताटीव्हीवर सामना कुठे पाहता येईल?भारत-पाकिस्तान सुवर्णपदकाचा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येईल. प्रेक्षकांना हिंदी आणि इंग्रजी भाषेतील समालोचनाचा आनंद घेता येणार आहे.मोबाईलवर लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?मोबाईल आणि स्मार्ट डिव्हाइसवर हा सामना Sony LIV ॲपवर लाईव्ह पाहता येईल. तसेच, BCCI TV वरही सामन्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.भारत-पाकिस्तान सामना विनामूल्य कुठे पाहता येईल?ज्या प्रेक्षकांकडे कोणतेही सबस्क्रिप्शन नाही, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारत-पाकिस्तान सुवर्णपदकाचा सामना DD Sports चॅनलवर पूर्णपणे मोफत पाहता येईल. DD Free Dish वापरणारे प्रेक्षक कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता या महामुकाबल्याचा आनंद घेऊ शकतात.याशिवाय, सामन्याचे लाईव्ह स्कोअर, बॉल-बाय-बॉल अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडी ABP Marathi Live वरही वाचता येतील. भारत-पाकिस्तान सुवर्णपदकाच्या या महासंग्रामात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
IND vs PAK Live Asian Games 2026 Final : रोमांचक सामन्यात श्रेयसच्या ब्रिगेडने मारलं जपानचं मैदान! पाकिस्तानला 19 धावांनी हरवत जिंकलं सुवर्णपदक,
जपानमधील कोरोगी स्पोर्ट्स पार्क येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले.
Continues below advertisement
IND vs PAK Live Asian Games 2026 Final : रोमांचक सामन्यात श्रेयसच्या ब्रिगेडने मारलं जपानचं मैदान! पाकिस्तानला 19 धावांनी हरवत जिंकलं सुवर्णपदक,
जपानमधील कोरोगी स्पोर्ट्स पार्क येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले.