India vs Pakistan, Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना श्रीलंका येथील पल्लेकेले स्टेडिअमवर सुरु आहे. महामुकाबल्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियात कमबॅक केले.. टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये मोहम्मद शामी याला स्थान मिळाले नाही. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झालाय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावरुन टीम इंडियाच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली. 


रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ तीन अष्टपैलू खेळाडूसह मैदानात उतरला आहे. शार्दुल ठाकूर, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांना संधी दिली आहे. त्यामुळे मोहम्मद शामी याला संघात स्थान मिळाले नाही. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह गोलंदाजीची धुरा सांभाळतील. शामी याला संघात स्थान न मिळाल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. शामीला का संधी दिली नाही ?  असा सवाल उपस्थित केला जातोय. 


मोहम्मद शामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 च्या फायनलनंतर आराम करत आहे. आशिया चषकाच्या संघात शामीला संघात स्थान मिळाले आहे. पण प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकले नाही. टीम मॅनेजमेंटने शामीला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. फलंदाजीमधील ताकद वाढवण्यासाठी शार्दुल ठाकूर याला संघात स्थान देण्यात आले आहे, असे सांगण्यात येतेय. शार्दुल ठाकूर तळाला चांगली फलंदाजी करु शकतो.  


































 


भारताची खराब सुरुवात - 


प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा  11 तर विराट कोहली 4 धावा काढून तंबूत परतले. सध्या श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल मैदानावर आहेत.