India Vs New Zealand 5th T20 Records : भारताने पाचव्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 46 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. शनिवारी तिरुवनंतपुरम येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.ईशान किशनच्या दमदार शतकासह आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून तब्बल 271 धावांचा डोंगर उभा केला.
बांगलादेश (297/6) आणि श्रीलंका (283/1) नंतर न्यूझीलंडविरुद्ध भारताची ही टी-20 मधील तिसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली. तसेच, न्यूझीलंडविरुद्ध भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा टी-20 स्कोअर आहे. प्रत्युत्तर, न्यूझीलंडचा संघ 225 धावांत सर्वबाद झाला. फिन अॅलनने 80 धावांची झुंजार खेळी करत एकट्याने लढा दिला. या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. दरम्यान, या सामन्यात 5 ऐतिहासिक विक्रम घडले....
टी-20 आंतरराष्ट्रीयतील सर्वात महागडा 5 विकेट्सचा स्पेल
अर्शदीप सिंगने तिरुवनंतपुरम येथे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात महागडा पाच विकेट्सचा स्पेल टाकला. त्याने 4 षटकांत 51 धावा देत 5 बळी घेतले.
भारताचा टी-20 आंतरराष्ट्रीयतील तिसरा सर्वात मोठा स्कोअर
न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या टी-20 सामन्यात भारताने 271 धावा केल्या. हा भारताचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरा सर्वोच्च स्कोअर आहे.
भारताविरुद्ध सर्वात वेगवान अर्धशतक
तिरुवनंतपुरम येथे न्यूझीलंडने अवघ्या 3.1 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या. भारताविरुद्ध टी-20 सामन्यात कोणत्याही संघाने केलेले हे सर्वात जलद अर्धशतक ठरले.
भारतासाठी तिसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी
ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी रचली. टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी तिसऱ्या विकेटसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे.
भारत–न्यूझीलंड टी-20 सामन्यातील सर्वाधिक धावा
या सामन्यात दोन्ही संघ मिळून एकूण 496 धावा झाल्या. भारत–न्यूझीलंड यांच्यातील टी-20 सामन्यांमधील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. यासोबतच या सामन्यात तब्बल 36 षटकार लगावले गेले, जे टी-20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील एका सामन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक षटकार आहेत.
हे ही वाचा -
