Ind vs NZ 2nd T20 : 6 धावांवर दोन विकेट्स, सामना निसटतोय असं वाटलं… पण ईशान–सूर्यकुमारने गेम फिरवला! टीम इंडियाचा 31 चेंडू आधीच विजय

Ind vs NZ 2nd T20 Update Marathi : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे.

किरण महानवरLast Updated: 23 Jan 2026 10:34 PM

पार्श्वभूमी

Ind vs NZ 2nd T20 Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर...More

Ind vs NZ 2nd T20 : 6 धावांवर दोन विकेट्स, सामना निसटतोय असं वाटलं… पण ईशान–सूर्यकुमारने गेम फिरवला! टीम इंडियाचा 31 चेंडू आधीच विजय

भारताने न्यूझीलंडचा सात विकेट्सने पराभव केला आणि पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.


शुक्रवारी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, न्यूझीलंडने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत कर्णधार मिशेल सँटनरच्या नाबाद 47 आणि रचिन रवींद्रच्या 44 धावांच्या मदतीने 20 षटकांत सहा विकेट्स गमावून 208 धावा केल्या.


लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 15.2 षटकांत तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.


संजू सॅमसननंतर दुसरा सलामीवीर अभिषेक शर्मा दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला.


6 धावांवर दोन विकेट्स पडल्या होत्या, सामना निसटतोय असं वाटलं. पण ईशान–सूर्यकुमारने गेम फिरवला.


भारतीकडून इशान किशनने 76 आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद 82 धावांची सामना जिंकणारी खेळी केली.