एक्स्प्लोर

India vs Netherlands : 13 षटकार, 11 चौकार अन् फलकावर 193 धावा! शिवम दुबेची धमाकेदार फलंदाजी, हार्दिक पांड्याही चमकला, नेदरलँड्सला धू-धू धुतले

India vs Netherlands T20 World Cup 2026 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 193 धावांचा मजबूत टप्पा गाठला.

India vs Netherlands T20 World Cup 2026 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 193 धावांचा मजबूत टप्पा गाठला. नाणेफेक जिंकून कर्णधाराने आधी बॅटिंगचा निर्णय घेतला होता. मात्र अपेक्षेपेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळाले. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी आक्रमक मारा करत भारतीय फलंदाजांना सहज खेळ करू दिला नाही. विशेषतः आर्यन दत्तने प्रभावी गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले.

भारताची धक्कादायक सुरुवात...

भारताची सुरुवात मात्र धक्कादायक ठरली. सलामीवीर अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. या विश्वचषकात तिसऱ्यांदा तो खाते न उघडताच परतला. ईशान किशनने झटपट सुरुवात केली, पण केवळ 7 चेंडूत 18 धावा करून तोही माघारी परतला. तिलक वर्माने संयमी खेळ करत 31 धावांचे योगदान दिले, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने मधल्या षटकांमध्ये डाव सावरत 34 धावा केल्या. मात्र खऱ्या अर्थाने शिवम दुबेने डावाला वेग दिला. त्याने झंझावाती अर्धशतक ठोकत भारताला 193 धावांपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली.

शिवम दुबे नावाचं वादळ...

शिवम दुबे  नवव्या षटकात फलंदाजीला आला, तेव्हा त्याची सुरुवात अतिशय संथ झाली होती. पहिल्या 11 चेंडूमध्ये त्याने फक्त 6 धावा केल्या. मात्र त्यानंतर त्याने गिअर बदलला आणि पुढील 14 चेंडूमध्ये तब्बल 44 धावा ठोकत सामना भारताच्या बाजूने फिरवला. केवळ 25 चेंडूमध्ये त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले, टी-20 वर्ल्ड कपमधील त्याची ही पहिलीच अर्धशतकी खेळी ठरली. दुबेने 31 चेंडूत 66 धावांची झंझावाती खेळी साकारली, ज्यात 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.

हार्दिक पांड्याची साथ

हार्दिक पांड्या यानेही दुबेला साथ दिली. हार्दिकने 21 चेंडूत 30 धावा करत आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या 11 षटकांत भारताने केवळ 76 धावा केल्या होत्या. पण शेवटच्या 9 षटकांत भारतीय फलंदाजांनी तब्बल 117 धावा काढत सामन्याचा चेहरामोहरा बदलला. दुबे आणि हार्दिक यांच्यातील 76 धावांची भागीदारी हा या झंझावाती पुनरागमनाचा मुख्य आधार ठरला. अखेरच्या 9 चेंडूमध्ये भारताने 4 षटकार मारले, जरी त्याच वेळी 2 गडी बाद झाले. नेदरलँड्सकडून लोगान व्हॅन बीक सर्वाधिक प्रभावी ठरला. त्याने 3 विकेट्स घेत भारतीय फलंदाजांना काही प्रमाणात रोखण्याचा प्रयत्न केला. आर्यन दत्त याने 2 बळी घेतले, तर काइल क्लेन यानेही 1 विकेट आपल्या नावावर जमा केली. 

हे ही वाचा -

Abhishek Sharma : ज्याच्याकडून अपेक्षा होत्या, त्यानेच दिल्या जखमा; अभिषेक शर्माच्या नावे इतिहासातील 'काळा' रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India won T20 World Cup : सलग दुसऱ्यांदा भारतानं कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव, संघाला नेमकं किती मिळालं बक्षीस 
India won T20 World Cup : सलग दुसऱ्यांदा भारतानं कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव, संघाला नेमकं किती मिळालं बक्षीस 
T20 World Cup 2026 Team India Celebration : विजयी ट्रॉफी उचलताच टीम इंडियाचे भन्नाट सेलीब्रेशन, सूर्याने नेमकं काय केलं?, पाहा संपूर्ण Video
विजयी ट्रॉफी उचलताच टीम इंडियाचे भन्नाट सेलीब्रेशन, सूर्याने नेमकं काय केलं?, पाहा संपूर्ण Video
पुन्हा एकदा चॅम्पियन! अहमदाबादमध्ये मिळालेला विजय हा अभूतपूर्व, विराट कोहलीकडून खास शब्दात भारतीय संघाचं कौतुक
पुन्हा एकदा चॅम्पियन! अहमदाबादमध्ये मिळालेला विजय हा अभूतपूर्व, विराट कोहलीकडून खास शब्दात भारतीय संघाचं कौतुक
Abhishek Sharma Ind vs Nz : स्वतःवर विश्वास उरला नव्हता, पण... वर्ल्डकप जिंकताच अभिषेक शर्मा मनातलं सगळं बोलला; गौतम गंभीरबाबत मोठा खुलासा
स्वतःवर विश्वास उरला नव्हता, पण... वर्ल्डकप जिंकताच अभिषेक शर्मा मनातलं सगळं बोलला; गौतम गंभीरबाबत मोठा खुलासा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget