एक्स्प्लोर

IND vs NAM Score : टीम इंडियाची ‘दादागिरी’! नामीबिया संघाचं कंबरडं मोडलं, वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय

India vs Namibia Live Score T20 World Cup 2026 : भारत आणि नामीबिया यांच्यातील टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील हा सामना गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

LIVE

Key Events
India vs Namibia Live Score T20 World Cup 2026 Abhishek Sharma Suryakumar Yadav Sanju Samson Gerhard Erasmus Marathi News IND vs NAM Score : टीम इंडियाची ‘दादागिरी’! नामीबिया संघाचं कंबरडं मोडलं, वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय
India beat NAM T20 World Cup 2026
Source : ABP

Background

India vs Namibia Live Score T20 World Cup 2026 Marathi Update : नामीबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा आजारी असल्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत सस्पेन्स कायम आहे. मात्र या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पुनरागमन जवळपास निश्चित मानली जात आहे. 

IND vs NAM सामना कधी आणि कुठे होणार?

भारत आणि नामीबिया यांच्यातील टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील हा सामना गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल, तर नाणेफेक 6:30 वाजता पार पडेल. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

LIVE प्रक्षेपण कुठे पाहाल?

भारत विरुद्ध नामीबिया सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर पाहता येईल. हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये समालोचनासह सामना पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

मोबाईलवर फ्रीमध्ये कसा पाहाल सामना?

भारत–नामीबिया सामना जिओ हॉटस्टार अ‍ॅपवरही पाहता येईल. तुमच्याकडे जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन असल्यास मोबाईलवर सामन्याचा थेट आणि अखंड थरार अनुभवता येईल.

कोण आत, कोण बाहेर?

या सामन्यासाठी अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांच्या उपलब्धतेबाबत संभ्रम आहे. दुसरीकडे जसप्रीत बुमराहची पुनरागमनाची शक्यता बळकट मानली जात आहे. ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर सराव करताना दिसला आहे. जर अभिषेक खेळू शकला नाही, तर संजू सॅमसनला संघात संधी मिळू शकते.

22:39 PM (IST)  •  12 Feb 2026

IND vs NAM Score : टीम इंडियाची ‘दादागिरी’! नामीबिया संघाचं कंबरडं मोडलं, वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय

भारताने नामिबियावर 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

गुरुवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या गट सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 9 बाद 209 धावांचा भक्कम डोंगर उभारला.

210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाची फलंदाजी भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकली नाही.

संपूर्ण संघ 18.2 षटकांत 116 धावांवर गारद झाला आणि भारताने 93 धावांनी विजय नोंदवला.

या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. यापूर्वी पहिल्याच सामन्यात अमेरिकेला पराभूत करत टीम इंडियाने आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली होती.

या विजयामुळे भारताने गट ‘अ’च्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असून पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. आता सर्वांचे लक्ष रविवारी (15 फेब्रुवारी) होणाऱ्या भारत–पाकिस्तान सामन्याकडे लागले आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत दडपणाचा आणि प्रतिष्ठेचा ठरणार आहे.

 
 
20:59 PM (IST)  •  12 Feb 2026

IND vs NAM Live Score : शेवटच्या 2 षटकात टीम इंडियाची घसरगुंडी! 12 चेंडूमध्ये 5 विकेट्स अन् फक्त 10 धावा

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत नामिबियासमोर 210 धावांचे आव्हान उभे केले.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 20 षटकांत 9 बाद 209 धावा फलकावर लावल्या.

संघासाठी सलामीला उतरलेल्या ईशान किशनने सर्वात मोठी खेळी साकारली. त्याने अवघ्या 24 चेंडूमध्ये 6 चौकार आणि 5 षटकारांच्या जोरावर 61 धावा केल्या.

याशिवाय हार्दिक पांड्यानेही अर्धशतक झळकावत 52 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

मधल्या षटकांत दोघांच्या भागीदारीमुळे धावफलक वेगाने पुढे सरकत राहिला.

मात्र डावाचा शेवट भारतासाठी अत्यंत खराब ठरला.

अखेरच्या दोन षटकांत म्हणजेच शेवटच्या 12 चेंडूमध्ये भारताने 5 गडी गमावले आणि फक्त 10 धावा करता आल्या.

त्यामुळे 15 फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार आहे, त्याआधी सूर्या आणि गंभीरचं टेन्शन वाढलं आहे.

त्यामुळे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असतानाही संघाला अपेक्षित फिनिश मिळू शकला नाही.

नामिबियाकडून कर्णधार गेरहार्ड इरास्मसने सर्वाधिक 4 बळी घेत भारतीय फलंदाजांना दिला.

 
 
Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
NZ vs SA Semifinal T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
IND vs ENG T20 World Cup Semi Final : ईशान अन् संजू सलामीवीर, तर अभिषेक OUT? इंग्लंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11, कोच स्पष्टच बोलला
ईशान अन् संजू सलामीवीर, तर अभिषेक OUT? इंग्लंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11, कोच स्पष्टच बोलला
IND vs ENG T20 World Cup Semi Final : जिंकण्याची कोणतीच हमी नाही...; इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या कोचचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाला?
जिंकण्याची कोणतीच हमी नाही...; इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या कोचचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget