India vs Japan T20 Match : आशियाई गेम्सपूर्वी BCCIची मोठी घोषणा; जपानविरुद्ध पहिल्यांदाच ऐतिहासिक टी-20 सामना, कधी-कुठे होणार मॅच?
India vs Japan T20 Match In 22nd September : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 पूर्वी टीम इंडिया एका ऐतिहासिक सामन्यासाठी सज्ज झाला आहे.

India vs Japan T20 Match In 22nd September : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 पूर्वी टीम इंडिया एका ऐतिहासिक सामन्यासाठी सज्ज झाला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याआधी टीम इंडिया जपानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त हा सामना आयोजित करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि जपान यांच्यातील हा सामना 22 सप्टेंबर 2026 रोजी खेळवला जाणार आहे. जपानमधील तोचिगी येथील सानो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर या ऐतिहासिक सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
'सुझुकी कप' नावाने रंगणार सामना
भारत-जपान यांच्यातील या एकमेव टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याला सुझुकी कप असे नाव देण्यात आले आहे. स्पोर्ट 75 या उपक्रमाचा हा पहिला टप्पा असेल. दोन्ही देशांमधील क्रीडा क्षेत्रातील सहकार्य वाढवणे आणि भारताच्या 2036 ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक आयोजनाच्या प्रयत्नांना बळ देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
𝗛𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝘆 𝗜𝗻 𝗧𝗵𝗲 𝗠𝗮𝗸𝗶𝗻𝗴!
— BCCI (@BCCI) September 4, 2026
India🇮🇳 🤝 Japan🇯🇵#TeamIndia set to play a historic T20I against Japan to launch the celebrations of the 7️⃣5️⃣th Anniversary of India-Japan Diplomatic Relations. 👏👏@CricketJapan
All The Details 🔽https://t.co/vxdhuT1tgp pic.twitter.com/DQmPncvefH
BCCI सचिव देवजित सैकिया काय म्हणाले?
या ऐतिहासिक सामन्याबाबत बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आनंद व्यक्त केला. भारतीय आणि जपानी संघ या विशेष टी-20 सामन्यात आमनेसामने येणार असल्याचा बीसीसीआयला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारतीय संघाला जपान आणि पूर्व आशियासारख्या नव्या ठिकाणी क्रिकेट खेळण्याची अनोखी संधी मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जपान क्रिकेट असोसिएशनचे (JCA) CEO नाओकी मियाजी यांनीही या सामन्याचे स्वागत केले. सध्याच्या विश्वविजेत्या भारतीय संघाला मायदेशात खेळण्यासाठी आमंत्रित करणे हा जपान क्रिकेटसाठी विशेष क्षण असल्याचे त्यांनी म्हटले. भारतीय क्रिकेट चाहत्यांसह जपानमधील क्रिकेटप्रेमींना या ऐतिहासिक सामन्याचा आनंद घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आशियाई गेम्सपूर्वी टीम इंडियासाठी मोठी तयारी
विशेष म्हणजे, आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 साठी निवडलेला भारतीय संघच जपानविरुद्धच्या या सामन्यात खेळणार आहे. हा अधिकृत टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असल्याने त्याचा निकाल आणि खेळाडूंच्या कामगिरीची नोंद केली जाणार आहे. 28 सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा प्रवास सुरू होणार आहे. त्याआधी जपानमध्ये सामना खेळण्याची संधी मिळाल्याने भारतीय खेळाडूंना तेथील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत होऊ शकते.
हे ही वाचा -




















