मुंबई : ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात पराभूत केल्यानंतर भारताचा क्रिकेट संघ आज इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज आहे. बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीने संघाची घोषणा केली आहे.
भारत आणि इंग्लंड संघांमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका, पाच ट्वेण्टी 20 सामन्यांची मालिका आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. तर 28 मार्च रोजी शेवटच्या एकदिवसीय सामन्याने इंग्लंडचा भारत दौरा आटोपणार आहे.
भारत-इंग्लंड सामन्यांचं वेळापत्रक
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका वेळापत्रक
- पहिला सामना : 5 ते 9 फेब्रुवारी, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
- दुसरा सामना : 13 ते 19 फेब्रुवारी, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
- तिसरा सामना : 24 ते 28 फेब्रुवारी, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
- चौथा सामना : 4 ते 8 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
भारत विरुद्ध इंग्लंड ट्वेण्टी-20 मालिका वेळापत्रक
- पहिला सामना : 12 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
- दुसरा सामना : 14 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
- तिसरा सामना : 16 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
- चौथा सामना : 18 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
- पाचवा सामना : 20 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका वेळापत्रक
- पहिला सामना : 23 मार्च, महाराष्ट्र किक्रेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे
- दुसरा सामना : 26 मार्च, महाराष्ट्र किक्रेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे
- तिसरा सामना : 28 मार्च, महाराष्ट्र किक्रेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे
विराट, ईशांतचं कमबॅक; विहारी, शॉ संघाबाहेर
भारतीय संघात कर्णधारविराट कोहली आणि ईशांत शर्माचं पुनरागमन झालं आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध फारशी कमान न दाखवलेले हनुमा विहारी आणि पृथ्वी शॉ संघाबाहेर गेले आहेत. ईशांतसह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि आर अश्विन यांनाही इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळालं आहे. हे दोघांनाही आस्ट्रेलिया दौऱ्या दुखापत झाली होती. तर या संघात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पण करणाऱ्या टी. नटराजन आणि नवदीप सैनी यांचा स्थान मिळालेलं नाही.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर आणि अक्षर पटेल.