IND vs AUS 3rd ODI Live Streaming : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बुधवारी अखेरचा वनडे सामना होणार आहे. तीन सामन्याच्या मालिकेत भारताने याआधीच २-० ने आघाडी मारली आहे. मालिकेतील अखेरचा सामना राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. विश्वचषकाआधी प्रयोग करण्याची दोन्ही संघाकडे अखेरची संधी आहे, त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आपल्या पूर्ण ताकदीने मैदानात उतरु शकतील. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यासाठी नियमीत कर्णधार रोहित शर्मा परतलाय. पहिल्या दोन सामन्यात संघाची धुरा केएल राहुल याच्याकडे सोपवण्यात आली होती.
राजकोटमध्ये रोहित शर्मा शिवाय विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह परतणार आहेत. त्यामुळे प्लेईंग ११ मध्ये बदल निश्चित मानला जातोय. अखेरच्या सामन्याद्वारे भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला अंतिम रूप देऊ शकतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा तिसरा एकदिवसीय सामना तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता.. त्याबाबत जाणून घेऊयात
कधी आणि कुठे होणार अखेरची लढत ?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियमवर 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी एक वाजता नाणेफेक होईल.
टिव्हीवर कुठे पाहाल सामना ?
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्यातील अखेरचा सामना भारतात स्पोर्ट 18 नेटवर्क या चॅनलवर पाहता येईल. त्याशिवाय डीडी स्पोर्ट्स चॅनलवही तुम्ही सामना पाहू शकता.
फुकतात कुठे पाहालन लाइव स्ट्रीमिंग?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरचा सामना जियो सिनेमा अॅपवर मोफत सामना पाहता येईल. मोबाइल, लॅपटॉप अथवा अन्य कोणत्याही डिवाइसवर जिओवर मोफत सामना पाहता येईल.
तिसऱ्या वनडेसाठी भारताचे स्क्वाड
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाचे स्क्वाड
पॅट कमिंस (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशने, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), जोश इंग्लिस, मॅथ्यू शॉर्ट, सीन एबॉट, नाथन ऐलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेज़लवुड, स्पेंसर जॉनसन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा, मिचेल स्टार्क, एडम जंपा.