IND vs AFG 3rd ODI Update : अफगाणिस्तानवर भारताचा एकतर्फी विजय; यशस्वीच्या वादळी शतकाने मालिकेचा शेवट ‘सुपरहिट’

India vs Afghanistan 3rd ODI UPDATE In Marathi : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना आज खेळला जाईल.

Advertisement

किरण महानवरLast Updated: 20 Jun 2026 08:10 PM

पार्श्वभूमी

India vs Afghanistan 3rd ODI Score UPDATE In Marathi : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना आज खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नई येथे होणार...More

IND vs AFG 3rd ODI Live Score Update : अफगाणिस्तानवर भारताचा एकतर्फी विजय; यशस्वीच्या वादळी शतकाने मालिकेचा शेवट ‘सुपरहिट’

यशस्वी जैस्वालच्या शतकाच्या आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा नऊ गडी राखून पराभव केला.


प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 44.2 षटकांत 218 धावा केल्या.


प्रत्युत्तरात भारताने 28.4 षटकांत एक गडी गमावून 224 धावा केल्या आणि सामना जिंकला.


अशाप्रकारे, भारताने एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानवर 3-0 ने क्लीन स्वीप पूर्ण केला.


या सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने उत्कृष्ट गोलंदाजी केली, तर रोहित आणि यशस्वीने मोठ्या भागीदारीने संघाला मजबूत सुरुवात करून दिली.


या सामन्यात यशस्वी आणि रोहितने भारतासाठी जोरदार फलंदाजी केली. या दोन फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 170 धावा केल्या.


रोहित 79 धावांवर बाद झाला, तर यशस्वी 86 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि तीन षटकारांसह 110 धावांवर नाबाद राहिला.


दरम्यान, श्रेयस अय्यर दोन षटकारांसह 19 चेंडूंमध्ये 20 धावा करून नाबाद राहिला.


मोहम्मद नबीने अफगाणिस्तानसाठी एकमेव बळी घेतला.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.