Ind vs Afg 2nd ODI Update : भारताने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकली! दुसऱ्या वनडेत 107 धावांनी अफगाणचा उडवला धुव्वा, मालिका खिशात
India vs Afghanistan 2nd ODI LIVE Update : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज लखनऊ येथील इकाना क्रिकेट स्टेडियमवर काही वेळात सुरू होणार आहे.
किरण महानवरLast Updated: 17 Jun 2026 09:32 PM

पार्श्वभूमी
India vs Afghanistan 2nd ODI LIVE Update : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर काही...More
India vs Afghanistan 2nd ODI LIVE Update : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर काही वेळात सुरू होणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 7 विकेट्सने दमदार विजय मिळवला होता. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेमध्ये पावसामुळे व्यत्यय आल्याने सामना 25-25 षटकांचा करण्यात आला होता. त्या सामन्यात भारताने 13 चेंडू राखून विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली.भारताकडून कर्णधार शुभमन गिल याने 66 चेंडूंमध्ये 84 धावांची शानदार खेळी केली होती. त्याला केएल राहुल याने 19 चेंडूंमध्ये 39 धावांची तुफानी साथ दिली. गोलंदाजीत पदार्पण करणाऱ्या हर्ष दुबे आणि गुरनीत बरार यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत प्रभावी कामगिरी केली. आता दुसऱ्या वनडेमध्ये भारताची नजर विजयासह मालिका खिशात घालण्यावर असेल, तर अफगाणिस्तानचा संघ जोरदार पुनरागमन करून मालिका जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल.
Ind vs Afg 2nd ODI Update : भारताने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकली! दुसऱ्या वनडेत 107 धावांनी अफगाणचा उडवला धुव्वा, मालिका खिशात
दुसऱ्या एकदिवसीय (ODI) सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो भारतीय फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत तब्बल 402 धावांचा डोंगर उभारला.
403 धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ दबावाखाली आला.
त्यांच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर फार काळ तग धरता आला नाही.
संपूर्ण अफगाणिस्तानचा संघ 44.3 षटकांत 232 धावांवर ऑलआऊट झाला.