IND vs USA ICC Men's T20 World Cup 2026 : भारत आणि अमेरिकेदरम्यान टी-20 वर्ल्डकप 2026 मधील तिसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नाबाद 84 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 9 गडी गमावून 161 धावा केल्या. त्यामुळे अमेरिकेसमोर विजयासाठी 162 धावांचं आव्हान आहे.
अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे खातेही न उघडता बाद
नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवातच खराब झाली. अवघ्या 46 धावांवर भारताचे 4 गडी बाद झाले. अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे दोघेही शून्यावर बाद झाले. अभिषेकला अली खानने तंबूत पाठवलं, तर शिवम दुबेला शॅडली वान शाल्कविकने बाद केलं.
ईशान किशन अन् तिलक वर्माही नापास
यानंतर ईशान किशनने 16 चेंडूमध्ये 20 धावा केल्या. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 2 षटकार लगावले, मात्र शॅडली वान शाल्कविकनेच त्याला बाद केलं. तिलक वर्माने 16 चेंडूमध्ये 25 धावा केल्या, पण त्यालाही शॅडलीनेच तंबूचा रस्ता दाखवला.
मधल्या फळीत घसरगुंडी
यानंतर रिंकू सिंग 14 चेंडूमध्ये केवळ 6 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्यालाही खास कामगिरी करता आली नाही; तो 6 चेंडूमध्ये फक्त 5 धावा करून बाद झाला. अक्षर पटेल 11 चेंडूमध्ये 14 धावा करून बाद झाला, तर अर्शदीप सिंग 4 धावा करून तंबूत परतला.
सूर्यकुमार यादवची एकाकी पण झगमगती झुंज
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव अखेरपर्यंत खंबीरपणे उभा राहिला आणि संघाचा स्कोर 160 च्या पुढे नेला. सूर्यकुमारने 49 चेंडूंमध्ये नाबाद 84 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याच्या बॅटमधून 10 चौकार आणि 4 षटकार झळकले. अमेरिकेकडून शॅडली वान शाल्कविकने 4 विकेट्स घेतल्या, तर हरमीत सिंगने 2 गडी बाद केले.
हे ही वाचा -
