Indian Cricket Team Combination For World Cup 2023 : वनडे विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची निवड झाली. चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शऱ्मा यांनी पत्रकार परिषदेत 15 खेळाडूंची माहिती दिली. विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनबद्दल सध्या चर्चा सुरु आहे. भारतीय संघात 5 स्पेशालिस्ट फलंदाज, चार अष्टपैलू, दोन विकेटकिपर, तीन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज निवडला आहे.  


पाच प्रमुख फलंदाज कोणते ? 


कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्याकडे आघाडीच्या फळीची जबाबदारी आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुभव ही भारताची जमेची बाजू आहे. श्रेयस अय्यर मध्यक्रमसाठी निवडला आहे. त्याशिवाय पाचवा फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादव याची निवड करण्यात आली आहे.


5 फलंदाज : रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव. 


विकेटकीपर म्हणून कुणाला पसंती - 


भारतीय संघात विकेटकीपर म्हणून दोन जणांची निवड करण्यात आली आहे. केएल राहुल आणि इशान किशन यांची निवड झाली आहे. राहुल प्रथम विकेटकीपर म्हणून पसंती असेल. तर इशान किशन बॅकअप विकेटकीपर म्हणून असेल. संजू सॅमसन याची निवड झालेली नाही. 


विकेटकीपर: केएल राहुल आणि इशान किशन.


अष्टपैलू कोणते? 


भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या याला अष्टपैलू म्हणून संघात सामील करण्यात आलेय. त्याशिवाय अनुभवी अष्टपैलू रविंद्र जाडेजा याची निवडही करण्यात आली आहे. गोलंदाजी अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूर याला स्थान दिलेय. तर बॅटिंग अष्टपैलू म्हणून अक्षर पटेल याची निवड झाली आहे. 


अष्टपैलू -  : हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल. 


फिरकीचा भार कुलदीपच्या खांद्यावर - 


भारतीय संघात फक्त एकच प्रमुख फिरकी गोलंदाज निवडण्यात आला आहे. फिरकीची संपूर्ण जबाबदारी कुलदीप यादवच्या खांद्यावर असेल. कुलदीपच्या जोडीला रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. 
 
फिरकीपटू : कुलदीप यादव. 


वेगवान गोलंदाज -


विश्वचषकाच्या संघात तीन प्रमुख फिरकी गोलंदाजांना निवडले आहे. आपेक्षाप्रमाणे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश करणार आहे. यांच्या जोडीला हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर असतील. 


वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज  


विश्व कप 2023 साठी भारतीय संघ - 


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.