IND vs SA 2nd ODI Probable Playing XI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रांची येथे झालेला पहिला एकदिवसीय सामना अतिशय चुरशीचा झाला, ज्यामध्ये भारताने 17 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेनेही दमदार खेळ केला आणि विजयाच्या जवळ पोहोचला. आता दुसरा सामना 3 डिसेंबरला होणार असून या लढतीत दक्षिण आफ्रिका मालिकेत परतण्याचा प्रयत्न करेल, तर टीम इंडिया ही मालिका आपल्या नावावर करण्याच्या निर्धाराने उतरेल.

Continues below advertisement


रोहित-ऋतुराजची जोडी ओपनिंग करणार....


पहिल्या सामन्यात भारताने रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालला ओपनिंगला पाठवले, मात्र यशस्वीने निराशा केली. चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेला ऋतुराज गायकवाडही चमकू शकला नाही. खरंतर, ऋतुराज हा ओपनर आहे, त्यामुळे त्याला रोहितसोबत सलामीला पाठवले तर तो अधिक प्रभावी ठरू शकतो. यशस्वीपेक्षा ऋतुराजकडे अनुभव जास्त आहे.


चौथ्या क्रमांकावर तिलक वर्माला संधी?


यष्टीरक्षक मिडल ऑर्डरमध्ये फारसा अनुभव नसलेल्या ऋतुराजच्या जागी तिलक वर्मा हा पर्याय टीम मॅनेजमेंटकडे असू शकतो. तिलक मिडल ऑर्डरमध्ये आक्रमक, पण परिस्थितीनुसार खेळ करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी तो योग्य पर्याय मानला जात आहे.


पंत-नितीशला अजूनही वाट पाहावी लागणार


पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. विशेषतः कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांनी विकेट्स घेत सामन्याचा कल भारताकडे झुकवला. त्यामुळे हे दोघे दुसऱ्या वनडेतही निश्चित दिसतील. भारत पुन्हा एकदा 3 स्पिनर आणि 3 पेसर या कॉम्बिनेशनने उतरण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत नितीश रेड्डी आणि ऋषभ पंत यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. हर्षित राणाने आठव्या क्रमांकावर आणखी जबाबदारीने फलंदाजी करणे ही संघाची अपेक्षा असेल.


दुसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (IND vs SA 2nd ODI Probable Playing XI) : रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.


वनडे मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कॅप्टन, विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा,कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.


हे ही वाचा -


Ind vs Sa 2nd ODI : पुन्हा रोहित शर्मा अन् विराट कोहली द. आफ्रिकेला धू धू धुणार; दुसरा वनडे सामना कधी अन् कुठे रंगणार?, A टू Z माहिती