Ind vs Nz Playing XI : 4 मिस्ट्री स्पिनर! सेमीफायनलपूर्वी हिटमॅनची अनोखी खेळी; हर्षित राणा बाहेर, रोहित शर्मा म्हणाला....
India Playing XI vs Zew Zealand : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आज ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना खेळला जात आहे.

New Zealand vs India ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आज ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना खेळला जात आहे. दुबईमध्ये सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा टॉस हरला आहे. आता त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग 10 नाणेफेक गमावली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ भारतीय संघ प्रथम फलंदाजी करेल. नाणेफेकीनंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या सामन्यात दोन बदल झाले आहेत. भारत आणि न्यूझीलंडने प्रत्येकी एक बदल केला आहे.
Your #TeamIndia to face New Zealand 💪
— BCCI (@BCCI) March 2, 2025
Updates ▶️ https://t.co/Ba4AY30p5i#NZvIND | #ChampionsTrophy pic.twitter.com/JidmjdEU28
वरुण चक्रवर्तीची एन्ट्री
न्यूझीलंड संघाविरुद्धच्या या सामन्यात हर्षित राणाला विश्रांती देण्यात आली आहे. उपांत्य फेरीपूर्वी त्याला ताजेतवाने ठेवण्यासाठी त्याला या सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी वरुण चक्रवर्तीला खेळण्याची संधी मिळाली आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला?
भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, टॉसमुळे त्याला जास्त नुकसान झाले नाही. कारण आम्हाला ही प्रथम फलंदाजी करायची होती. भारतीय प्लेइंग-11 मध्येही एक बदल आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणाला विश्रांती देण्यात आली आहे आणि त्याच्या जागी वरुण चक्रवर्तीची निवड करण्यात आली आहे. भारताने चार फिरकी गोलंदाज आणि फक्त एक वेगवान गोलंदाज मैदानात उतरवला आहे. हार्दिक दुसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका साकारेल. भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यात सलग 13 व्यांदा नाणेफेक हारले आहे.
🚨 Toss 🚨 #TeamIndia have been to put into bat first against New Zealand
— BCCI (@BCCI) March 2, 2025
Updates ▶️ https://t.co/Ba4AY30p5i#TeamIndia | #NZvIND | #ChampionsTrophy pic.twitter.com/uhSvImvgEQ
भारत आणि न्यूझीलंड प्लेइंग-11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी.
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, डॅरिल मिचेल, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), विल ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, विल यंग, काइल जेमिसन.
हे ही वाचा -
















