India Playing XI For 1st ODI vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार असून, या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. या संघात शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांची पुनरागमन झाले असून, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड आणि ध्रुव जुरेल यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
रोहित-गिल सलामीला, नितीश-यशस्वी OUT
न्यूझीलंडचा संघ तगडा असून, भारताला या एकदिवसीय मालिकेत कडवी झुंज देण्याची त्यांची पूर्ण क्षमता आहे. त्यामुळे ही मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाने सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरावे लागणार आहे. संभाव्य प्लेइंग इलेव्हन काहीशी अशी असू शकते.
श्रेयस अय्यर कोणत्या क्रमांकावर खेळणार?
भारताकडून डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे करणार आहेत. गिलच्या पुनरागमनामुळे यशस्वी जैस्वालला या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजी करताना दिसेल, तर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. मात्र, अय्यरचा सहभाग त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, अशी माहिती बीसीसीआयने आधीच दिली आहे.
केएल राहुलच पहिली पसंती, ऋषभ पंतचा पत्ता कट
पाचव्या क्रमांकावर केएल राहुलला संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. विकेटकीपर म्हणून पण केएल राहुलच पहिली पसंती असेल. त्यामुळे ऋषभ पंतचा पत्ता कट होऊ शकतो. सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू फिरकीपटू रवींद्र जडेजा खेळण्याची शक्यता आहे, तर सातव्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जाऊ शकते.
गोलंदाजी विभागात फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवचा समावेश अपेक्षित आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळू शकते. तिसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी हर्षित राणा किंवा प्रसिद्ध कृष्णा यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग-11 (India's probable playing XI vs New Zealand) : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा/प्रसिद्ध कृष्णा.
न्यूझीलंड विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ (India's ODI squad against New Zealand) : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल.
हे ही वाचा -