IND vs AFG Playing XI Asian Games 2026 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील आपल्या मोहिमेला अफगाणिस्तानविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्याने सुरुवात करणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना सोमवार, 28 सप्टेंबर रोजी निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कवर खेळवला जाणार आहे. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक 9.30 वाजता होणार आहे. उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार असल्याने या सामन्यासाठी अंतिम प्लेइंग इलेव्हनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, संघात जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

संजू-अभिषेक सलामीला

भारतीय संघ व्यवस्थापनाने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे सलामीचे प्रमुख फलंदाज असतील, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धही या दोघांकडून डावाची सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागू शकते. वैभवने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने खेळलेल्या चार टी-20 सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही.

Continues below advertisement

बुमराह-अर्शदीपवर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग या अनुभवी वेगवान गोलंदाजांवर गोलंदाजीची धुरा असण्याची शक्यता आहे. जपानमधील परिस्थिती आणि फिरकीला अनुकूल खेळपट्टी लक्षात घेता भारत तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा पर्यायही निवडू शकतो. वॉशिंग्टन सुंदरला टी-20 संघात नितीश रेड्डीच्या जागी स्थान मिळाले असून, त्याचाही Playing XI मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. सुंदरसोबत अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई या फिरकीपटूंवरही मोठी जबाबदारी असेल.

मधल्या फळीत श्रेयस, तिलक आणि ईशान

मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यर, तिलक वर्मा आणि ईशान किशन यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. श्रेयस संघाचे नेतृत्व करण्यासोबतच मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावेल. तर शिवम दुबे हा अष्टपैलू पर्याय म्हणून संघात असेल. विशेषतः अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करण्याची जबाबदारी त्याच्यावर असू शकते.

अफगाणिस्तानविरुद्ध भारताची Playing XI

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

आशियाई खेळ 2026 साठी भारतीय संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, विपराज निगम, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी.

हे ही वाचा -

Ind vs Wi 1st ODI Playing-11 : मोहम्मद सिराजला बाहेर ठेवलं अन् शुभमन गिलने अखेर आपल्या मित्राला Playing-11 मध्ये घेतलंच, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात डेब्यू