एक्स्प्लोर

ICC Women's World Cup 2025 Points Table : ऑस्ट्रेलिया पुन्हा टेबल टॉपर, तर सलग दोन पराभवानंतर Points Table मध्ये टीम इंडिया कुठे? जाणून घ्या A टू Z

ICC Women's World Cup 2025 Points Table Updated : आयसीसी महिला विश्वचषक 2025 मध्ये रविवारी ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून इतिहास रचला.

ICC Women's World Cup 2025 Points Table Updated : आयसीसी महिला विश्वचषक 2025 (ICC Women's World Cup 2025) मधील 13व्या लीग सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India VS Australia) महिला संघ आमनेसामने आले. विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या रोमांचक लढतीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 48.5 षटकांत 330 धावांचा डोंगर उभारला. मात्र, ऑस्ट्रेलियाने जबरदस्त खेळ करत 49व्या षटकात 7 गडी गमावून हे लक्ष्य पार केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने महिला विश्वचषकाच्या पॉइंट्स टेबलमध्ये (ICC Women's World Cup 2025 Points Table) अव्वल स्थान मिळवले असून, टीम इंडियाला पराभवाचा फटका बसला आहे. आता भारताला टॉप-4 मध्ये टिकून राहण्यासाठी उर्वरित सामने जिंकणे अत्यावश्यक ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया पुन्हा टेबल टॉपर, भारत तिसऱ्या स्थानावर (Australia goes top of table after beating India)

ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून इतिहास रचल्यानंतर ऑस्ट्रेलिया महिला संघ वर्ल्ड कपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. कंगारू संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले असून, त्यापैकी 3 सामने जिंकले आणि 1 सामना पावसामुळे रद्द झाला. त्याचे एकूण 7 गुण आणि +1.353 नेट रनरेट आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची महिला टीम आहे, जिने 3 सामन्यांत 3 विजय मिळवले असून त्यांचा नेट रनरेट +1.864 आहे. भारतीय महिला संघ पराभवानंतर तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे, पण त्यांचा नेट रनरेट घसरला आहे. टीम इंडियाने 4 सामने खेळले असून त्यापैकी 2 जिंकले आणि 2 हरले आहेत. भारताचा सध्याचा नेट रनरेट +0.682 आहे. चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे, ज्यांनी 3 सामन्यांत 4 गुण मिळवले असून त्यांचा नेट रनरेट -0.888 आहे.

न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर, पाकिस्तान तळाशी 

गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे, त्यांच्याकडे 3 सामन्यांतून 2 गुण असून नेट रनरेट -0.245 आहे.
तळाच्या तीन स्थानांवर आशियाई संघ आहेत, बांग्लादेशने 3 पैकी 1 सामना जिंकून सहावा क्रमांक मिळवला आहे. श्रीलंका एकाच गुणासह सातव्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तानचा संघ तीनही सामने हरल्यानंतर शेवटच्या पायरीवर म्हणजे आठव्या स्थानावर आहे.

इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा सामना निर्णायक ठरणार

हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आधी दक्षिण आफ्रिका आणि आता ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली. गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानावर कायम असला तरी संघाचा नेट रनरेट (+0.682) घसरला आहे. पुढचा सामना 19 ऑक्टोबरला इंदूरमध्ये इंग्लंडविरुद्ध होणार आहे, इंग्लंडचा अजूनपर्यंत एकही पराभव झालेला नाही, त्यामुळे हा सामना भारतासाठी निर्णायक ठरणार आहे.

हे ही वाचा -

Smriti Mandhana : 9 चौकार, 3 षटकार... स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अक्षरशः धू धू धुतले, एका वर्षांत 1000 धावा करत इतिहासात सुवर्णाक्षरात कोरलं नाव

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Success Story: 'एक डबा, एक ध्येय'; Akola चे मामा-भाचे MPSC परीक्षेत यशस्वी, दोघेही झाले Class-1 अधिकारी!
Temple Donation: तुळजाभवानी चरणी कोट्यवधींचं दान, दिवाळीत मिळाले ₹3.02 कोटी
Viral Video: 'स्टाफ हवा आहे', कल्याणमध्ये Doctor ने रुग्णवाहिकेसोबत जाण्यास दिला नकार!
Chemical Leak: 'पिकं पिवळी पडली', Nagpur-Tuljapur महामार्गावरील गळतीने शेतकरी हवालदिल
Pune Crime: 'माया टोळी'चा पुण्यात पुन्हा धुडगूस, Bajirao Road वर 17 वर्षीय Mayank Kharade वर वार, जागीच ठार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
Embed widget