india Defeat Afghanistan : भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. अभिषेक शर्माच्या वादळी खेळीनं अफगाणिस्तानचा डाव उद्धवस्त केला आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 127 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतानं अफगाणिस्तानविरुद्धची टी20 मालिका 3-0 ने जिंकली आहे. पहिल्या डावात भारतासाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. 

Continues below advertisement

अफगाणिस्तानचा संघ 14.1 षटकांत 94 धावांवर सर्वबाद 

आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 127 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने 3-0 ने मालिका जिंकली. भारताकडून अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 221 धावांचा डोंगर रचला होता. या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 14.1 षटकांत 94 धावांवर सर्वबाद झाला.

अभिषेक शर्माने भारतासाठी सर्वोच्च खेळी केली, त्याने 9 चौकार आणि 11 षटकारांच्या मदतीने 34 चेंडूंमध्ये 108 धावा केल्या. त्याने अवघ्या 30 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले आणि पूर्ण सदस्य संघासाठी सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला. संजूनेही 50 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 142 धावांची (59 चेंडू) सलामीची भागीदारी करून संघाला मजबूत केले. अभिषेक शर्माच्या रूपाने संघाची पहिली विकेट पडली, त्यानंतर धावगती मंदावली. 

Continues below advertisement

नितीश कुमार रेड्डीने एकाच षटकात तीन बळी घेतले

दुसऱ्या डावात, नितीश कुमार रेड्डीने एकाच षटकात तीन बळी घेत भारतासाठी सर्वाधिक बळी घेतले. रवी बिश्नोईनेही तीन बळी घेतले. अक्षर पटेलने दोन बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

 पहिल्या विकेटसाठी 142 धावांची ऐतिहासिक भागीदारी

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने गोलंदाजांना चोप देत पॉवरप्लेमध्येच आपल्या संघाचे शतक पूर्ण करून इतिहास रचला. त्यानंतर अभिषेकने आपले शतक पूर्ण केले, पण 10 व्या षटकात तो 108 धावांवर बाद झाला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 142 धावांची ऐतिहासिक भागीदारी केली आहे. 

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याची वेळ भारतीय संघावर आली. यानंतर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने बॅटने धुमाकूळ घातला. पहिल्या षटकात केवळ 5 धावा झाल्या असल्या तरी, त्यानंतर अभिषेकने एक धगधगती खेळी सुरू केली. त्याने पाचव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर पुढच्या 14 चेंडूंमध्ये त्याने आपले शतक पूर्ण केले आहे. वादळी आणि व्करमी खेळी केली आहे.