IND vs USA : मी किती प्रेशरमध्ये होतो, हे फक्त मलाच माहीत…; सामना जिंकला, कर्णधार फलंदाजांवर भडकला, सूर्या नेमकं काय म्हणाला?
India beat USA T20 World Cup 2026 : शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेवर 29 धावांनी विजय मिळवला.

Suryakumar Yadav T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारताच्या मोहिमेला विजयी सुरुवात झाली. शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेवर 29 धावांनी विजय मिळवला. या विजयाचा खरा शिल्पकार भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव ठरला. त्याने 49 चेंडूमध्ये नाबाद 84 धावांची वादळी खेळी करत संघाचा डाव सावरला. या अफलातून खेळीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
A captain’s knock to start the campaign 🫡
— BCCI (@BCCI) February 7, 2026
For his match-winning 84*(49), @surya_14kumar wins the Player of the Match as #TeamIndia begin the #T20WorldCup with a win!
Scorecard ▶️ https://t.co/Rlm2ARPVEt#MenInBlue | #INDvUSA pic.twitter.com/TAz0KIYnkH
‘77 धावांवर 6 विकेट्स… तो क्षण फार कठीण होता’
सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, “खरं सांगायचं तर 77 धावांवर 6 विकेट्स पडल्या होत्या, त्या क्षणी मी किती प्रेशरमध्ये होतो, हे फक्त मलाच माहीत आहे. पण याआधीही अशा परिस्थितीत मी फलंदाजी केली आहे. मुंबईच्या मैदानांवर मी खूप क्रिकेट खेळलो आहे, त्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहिलो तर फरक घडवू शकतो, याचा मला विश्वास होता.
वानखेडेच्या खेळपट्टीबाबत काय म्हणाला सूर्या?
“ही खेळपट्टी थोडी वेगळी होती. सकाळी उठल्यावर जाणवलं की बाहेर ऊन नव्हतं. क्युरेटर आणि ग्राउंड्समनने सर्वोत्तम खेळपट्टी तयार करण्याचा प्रयत्न केला, पण काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. पिच रोलिंग आणि पाणी देण्यासाठी आवश्यक ऊन मिळाली नाही, कदाचित त्याचा परिणाम दिसला. मात्र त्याला पूर्णपणे कारण देऊन चालणार नाही. आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो नाही, असे सूर्यकुमार यादव म्हणाला.
सामना जिंकला तरी कर्णधार फलंदाजांवर नाराजी
विजयानंतर सूर्या आपल्या फलंदाजांवर नाराज असल्याचं स्पष्ट झालं. “जिंकल्यानंतरही शिकण्यासारखं खूप काही असतं. आज आम्ही शिकलो की थोडी अधिक समजूतदार फलंदाजी करता आली असती. छोट्या-छोट्या भागीदाऱ्या केल्या असत्या तर आपण सहज 160 धावांपर्यंत पोहोचू शकलो असतो. एक-दोन फलंदाजांनी शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता,” असे सूर्या म्हणाला.
शेवटी तो पुढे म्हणाला, “आता काही हरकत नाही. पुढील सामन्यासाठी आमच्याकडे पाच दिवसांचा ब्रेक आहे. आम्ही विश्रांती घेऊ, चुका सुधारू आणि आणखी मजबूत होऊन मैदानात उतरणार आहोत.”
हे ही वाचा -





















