एक्स्प्लोर

India vs Pakistan : टीम इंडियाच्या वाघांनी पाकिस्तानचा फडशा पाडला, आधी फलंदाजांनी धुतलं, नंतर गोलंदाजांनी कंबरडं मोडलं, भारताचा मोठा विजय

India Beat Pakistan T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये चाहत्यांना ज्या हाय-व्होल्टेज सामन्याची प्रतीक्षा होती, त्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

India Beat Pakistan T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये चाहत्यांना ज्या हाय-व्होल्टेज सामन्याची प्रतीक्षा होती, त्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कोलंबोच्या ऐतिहासिक आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या विजयासह 6 गुणांची कमाई करत सुपर-8 फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. या पराभवामुळे पाकिस्तानच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना आपला शेवटचा सामना 'करो किंवा मरो' अशा स्थितीत कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.

ईशान किशनने वाजवलं पाकिस्ताचं बँड

भारताने 20 षटकांत सात गडी बाद 175 धावा केल्या. भारताकडून ईशान किशनने अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे, या सामन्यात पाकिस्तानने फिरकी गोलंदाजांनी भारताविरुद्ध 18 षटके टाकली. भारताकडून ईशानने 40 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांसह 77 धावा केल्या, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत तीन चौकारांसह 32 धावा केल्या.

भारताकडून शिवम दुबे 27 धावा करून बाद झाला, तर तिलक वर्माने 25 धावा केल्या. रिंकू सिंग चार चेंडूत एक चौकार आणि एक षटकारासह 11 धावा करून नाबाद राहिला. पाकिस्तानकडून सॅम आयुबने तीन बळी घेतले, तर सलमान आघा, शाहीन आफ्रिदी आणि उस्मान तारिकने प्रत्येकी एक बळी घेतला.

टीम इंडियाने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले 

176 धावांचा पाठलाग करताना हार्दिक पांड्या आणि बुमराह जोडीने पाकिस्तानच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. अवघ्या 12 चेंडूच्या खेळात पाकिस्तानचा कर्णधार आणि टॉप ऑर्डर तंबूत परतले. हार्दिक पांड्याने डावाच्या पहिल्याच षटकात पाकिस्तानला पहिला आणि मोठा धक्का दिला. सलामीवीर साहिबजादा फरहान याला खातेही उघडता आले नाही.  

बुमराहने डावाच्या दुसऱ्या षटकात सॅम अयुबला (6 धावा) पायचीत (LBW) करत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. बुमराह इथेच थांबला नाही. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाला (4 धावा) आऊट केले. फक्त 13 धावांवर 3 महत्त्वाचे गडी गमावल्यामुळे पाकिस्तानचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे. 

त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे पाकिस्तानचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्यामुळे पाकिस्तानचा पूर्ण संघ अवघ्या 114 धावांवर गारद झाला. यामुळे भारताला हा एकतर्फी विजय मिळवता आला.

हे ही वाचा -

Ind vs Pak : कोलंबो ठरला इतिहासाचा साक्षीदार! ईशान किशनचं वादळ, पाकिस्तान हादरला, भारताचा सर्वात मोठा स्कोर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG Semi Final LIVE Update 2026 : खळबळजनक! सेमीफायनलमध्ये भारताचा पत्ता कट होणार... पाकिस्तानी मोहम्मद आमिरची भविष्यवाणी, जाणून घ्या Live अपडेट्स
जो जिंकेल टॉस, तोच बनेल बॉस... वानखेड्यावर टॉसच ठरवणार भारत-इंग्लंड लढतीचा निकाल? जाणून घ्या Live अपडेट्स
Ind vs Eng Semi-Final Tickets : भारत-इंग्लंड सेमीफायनलचं तिकीट न मिळाल्याने आमदार संतापले, विधानपरिषदेत राडा, म्हणाले, 'पोलीस अन् अधिकाऱ्यांना मॅचची तिकिटं पण...'
भारत-इंग्लंड सेमीफायनलचं तिकीट न मिळाल्याने आमदार संतापले, विधानपरिषदेत राडा, म्हणाले, 'पोलीस अन् अधिकाऱ्यांना मॅचची तिकिटं पण...'
Pakistan T20 World Cup 2026 : वर्ल्डकपदरम्यान हॉटेलमध्ये 'ती' एकटी होती अन् तो आला... पाकिस्तानी क्रिकेटरचं हाउसकीपिंग महिलेसोबत नको ते कृत्य
वर्ल्डकपदरम्यान हॉटेलमध्ये 'ती' एकटी होती अन् तो आला... पाकिस्तानी क्रिकेटरचं हाउसकीपिंग महिलेसोबत नको ते कृत्य
Iran-Israel War : युद्धाची धास्ती आता क्रिकेटच्या खेळपट्टीवर... इराण-इस्रायल तणावात वर्ल्ड कप लीग 2 चे सामने रद्द; ICCचा मोठा निर्णय
युद्धाची धास्ती आता क्रिकेटच्या खेळपट्टीवर... इराण-इस्रायल तणावात वर्ल्ड कप लीग 2 चे सामने रद्द; ICCचा मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
Rajya Sabha Election 2026 Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला शिवसेनेकडून राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
अमेरिका इस्त्रायलच्या इराण हल्ल्याचे 100 तास; एक हजारांवर मृत्यूमुखी, 17 इराणी जहाजे बुडाली; 9 देशातील 14 अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त, भारताच्या हद्दीतही अमेरिकेची थेट घुसखोरी
अमेरिका इस्त्रायलच्या इराण हल्ल्याचे 100 तास; एक हजारांवर मृत्यूमुखी, 17 इराणी जहाजे बुडाली; 9 देशातील 14 अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त, भारताच्या हद्दीतही अमेरिकेची थेट घुसखोरी
लेकाच्या डोक्यावर अक्षदा टाकल्या! सचिन तेंडूलकरचा रॉयल अंदाज पाहून चाहते भारावले, पहा Exclusive फोटो
लेकाच्या डोक्यावर अक्षदा टाकल्या! सचिन तेंडूलकरचा रॉयल अंदाज पाहून चाहते भारावले, पहा Exclusive फोटो
Embed widget