एक्स्प्लोर

IND vs PAK Shahid Afridi on Pakistan Team : भारताकडून लाजिरवाणा पराभव; शाहिद आफ्रिदीचा संताप, जावयालाही नको नको ते बोललो, पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ

Shahid Afridi on Pakistan Team Marathi News : कोलंबो येथे रंगलेल्या भारत–पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला तब्बल 61 धावांनी पराभूत करत एकतर्फी विजय मिळवला.

IND vs PAK, Shahid Afridi on Pakistan Team : कोलंबो येथे रंगलेल्या भारत–पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला तब्बल 61 धावांनी पराभूत करत एकतर्फी विजय मिळवला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने थेट आपल्या संघावर, आणि विशेषतः आपल्या जावई शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) तसेच बाबर आजम (Babar Azam) टीका करत खळबळजनक विधान केले आहे.

शाहिद आफ्रिदी संतापला, पाकिस्तानी खेळाडूंना नको नको ते बोललो... 

पाकिस्तानी न्यूज चॅनलवर बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, “शाहीन, बाबर आणि शादाबला बाहेर करा. मोठ्या सामन्यांमध्ये त्यांनी वारंवार निराशाजनक कामगिरी केली आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात नवीन खेळाडूंना संधी द्या आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवा.”

आफ्रिदी पुढे म्हणाला, “जर निर्णय माझ्या हातात असता, तर मी शाहीन, बाबर आणि शादाबला संघाबाहेर ठेवले असते. वरिष्ठ खेळाडू जर सातत्याने अपयशी ठरत असतील, तर नव्या खेळाडूंना संधी देणे गरजेचे आहे. आपण इतक्या काळापासून पाहतोय की हेच खेळाडू खेळत आहेत, पण अपेक्षित कामगिरी होत नाही. आता नव्या चेहऱ्यांना पुढे आणण्याची वेळ आली आहे.”

भारताविरुद्ध शाहीन आफ्रिदी अन् बाबर आजमची कामगिरी (Shaheen Afridi and Babar Azam vs India)

भारताविरुद्धच्या सामन्यात शाहीन आफ्रिदी याने फक्त 2 षटकांत 31 धावा दिल्या. दुसरीकडे बाबर आजमला अवघ्या 5 धावांवर समाधान मानावे लागले. त्याला अक्षर पटेल याने बोल्ड करून माघारी पाठवले. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर टीकेची झोड उठली असून, आगामी नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघरचनेत बदल होण्याची शक्यता आता चर्चेत आली आहे. 

भारत–पाकिस्तान वर्ल्डकप सामना कसा राहिला? (India vs Pakistan T20 World Cup 2026)

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा खाते न उघडता बाद झाला, परंतु इशान किशनने तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूत 77 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही 32 धावा केल्या, तर रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत भारताला 170 धावांच्या पुढे नेले. 

भारताच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना पाकिस्तानी फलंदाजांना करता आला नाही. पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याने साहिबजादा फरहानला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी फलंदाजांना गुडघ्यावर बसवले. बाबर आझमने 5, उस्मान खानने 44 धावा केल्या. तर शाहीन आफ्रिदी 23 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानी संघाची अवस्था इतकी वाईट होती की उस्मान आणि शाहीन वगळता इतर कोणताही फलंदाज 20 धावाही करू शकला नाही.

हे ही वाचा -

India vs Pakistan : पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रम समोर येताच रोहित शर्माने काय केलं?, VIDEO ने धुमाकूळ

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir On MS Dhoni : MS धोनी बोलला, कोच साहेब, कधी तरी तुमच्या चेहऱ्यावर...; आता गौतम गंभीरचा रिप्लाय, म्हणाला, तुला पाहून...
MS धोनी बोलला, कोच साहेब, कधी तरी तुमच्या चेहऱ्यावर...; आता गौतम गंभीरचा रिप्लाय, म्हणाला, तुला पाहून...
Shoaib Akhtar On Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : 2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
Rohit Sharma And Ritika Sajdeh Video Ind vs NZ Final: रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: वेस्ट इंडिज, इंग्लंड, मग फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
मुंबईतून स्वीकृत नगरसेवकपदी नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
मुंबईतून स्वीकृत नगरसेवकपदी नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Embed widget