एक्स्प्लोर

IND vs PAK Asian Games 2026 Final : भारताचा आशियावर झेंडा, पाकिस्तान चारीमुंड्या चीत, श्रेयस अय्यरच्या टीम इंडियाने गोल्ड मेडल जिंकलं!

Shreyas Iyer Team India Won Gold Medal Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला.

India VS Pakistan Asian Games 2026 Final : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 19 धावांनी दणदणीत पराभव केला. जपानमधील कोरोगी स्पोर्ट्स पार्क येथे रंगलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय फलंदाजांनी पूर्णपणे सार्थ ठरवला. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर भारताने बोर्डावर 6 बाद 211 धावांचा डोंगर उभारला. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांच्या भेदक मारासमोर पाकिस्तानचा हसन नवाझ एकटा पडला. त्याने 96 धावांची धडाकेबाज खेळी केली, परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर पाकिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारताची पाकिस्तानविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी

पाकिस्तानविरुद्धच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात भारतीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र, भारताला पहिला धक्का वैभवच्या रूपाने बसला. वैभव 9 चेंडूंमध्ये 15 धावा करून बाद झाला. त्याने दोन षटकार ठोकले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याला विकेट गमवावी लागली. वैभव स्वस्तात बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने भारताचा डाव सावरत पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. अभिषेकने अवघ्या 28 चेंडूंमध्ये 61 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार होते. दरम्यान, संजू सॅमसन 4 चेंडूंमध्ये 2 धावा करून बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूंमध्ये 21 धावा केल्या, तर इशान किशनने 18 चेंडूंमध्ये 20 धावांचे योगदान दिले.

तिलक-शिवमने भारताला 200 पार नेले

भारताच्या डावाला मोठी धावसंख्या मिळवून देण्यात तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी अखेरच्या टप्प्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने 15 चेंडूंमध्ये 27 धावा ठोकल्या. त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. दुसरीकडे, तिलक वर्माने नाबाद 51 धावांची खेळी करत भारताला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. तिलकने अवघ्या 22 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 4 षटकारांसह 51 धावा केल्या. अशाप्रकारे भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 211 धावा केल्या.

हसन नवाझ एकटा पडला, भारताचा विजय

भारताने दिलेल्या 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानसाठी साहिबजादा फरहान आणि माझ सदाकत यांनी डावाची सुरुवात केली. कर्णधार फरहान 10 धावांवर, तर सदाकत 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर उस्मान खान 3 धावांवर बाद झाला. सॅम अयुबने संघासाठी 29 धावा केल्या, तर अब्दुल समद 9 धावांवर बाद झाला. या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघासाठी हसन नवाझने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 28 चेंडूंमध्ये 5 षटकारांसह 50 धावा पूर्ण करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 51 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 7 षटकारांसह 96 धावांची धडाकेबाज खेळी केली, परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारतासाठी अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. भारताने सुवर्णपदकावर कब्जा केला. तर पाकिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

हे ही वाचा - 

IND vs PAK Asian Games 2026 Final : वैभव, संजू, श्रेयस फेल, तरीही टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध टी-20 मध्ये सर्वोच्च धावा ठोकल्या; थेट इतिहास-भूगोल बदलून टाकला

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar On Smriti Mandhana: स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Ind vs NZ T20 Series: भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
Embed widget