एक्स्प्लोर

Ind vs NAM T20 World Cup 2026 : टॉप वर फक्त आम्हीच! नामिबियाला नमवून टीम इंडिया अव्वल स्थानी, Point Table मध्ये फेरबदल; पाकिस्तानची कितव्या स्थानी घसरण?

T20 World Cup Points Table 2026 : सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं नामिबियाचा 93 धावांनी धुव्वा उडवून, टी-20 विश्वचषकात आपला दुसरा विजय साजरा केला.

India beat NAM T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं नामिबियाचा 93 धावांनी धुव्वा उडवून, टी-20 विश्वचषकात आपला दुसरा विजय साजरा केला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी नामिबियाला विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं आणि आपल्या विजयाचा जणू पाया रचला. त्यानंतर हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्या आक्रमणासमोर नामिबियाचा अख्खा डाव 116 धावांत गडगडला. त्याआधी, भारतानं 20 षटकांत नऊ बाद 209 धावांची मजल मारली होती. भारताकडून ईशान किशननं 24 चेंडूत 61 धावांची आणि हार्दिक पंड्यानं 28 चेंडूत 52 धावांची खेळी उभारली.

पाकिस्तानला मोठा धक्का; गुणतालिकेत फेरबदल 

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वच आघाड्यांवर चमकदार कामगिरी केली. या विजयामुळे भारताने गट 'अ' मध्ये पाकिस्तानला मागे टाकत थेट अव्वल स्थान पटकावले आहे. या 93 धावांच्या मोठ्या विजयामुळे भारताचा 'नेट रन रेट' देखील सुधारला आहे. या विजयाचा सर्वात मोठा फटका पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला बसला आहे. भारताने सलग दुसरा विजय नोंदवल्यामुळे पाकिस्तानची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. अमेरिकेला नमवल्यानंतर आता नामिबियावर विजय मिळवून टीम इंडियाने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. आता सर्वांचे लक्ष रविवारी (15 फेब्रुवारी) होणाऱ्या हायव्होल्टेज भारत-पाकिस्तान सामन्याकडे लागले आहे. गुणतालिकेतील वर्चस्व आणि प्रतिष्ठेसाठी हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा विजय! 

भारताने नामिबियावर तब्बल 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. धावांच्या फरकाच्या दृष्टीने हा भारताचा टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी भारताचा सर्वात मोठा विजय 2012 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध 90 धावांचा होता. धावांच्या फरकाने सर्वात मोठ्या विजयांच्या यादीत भारत सध्या दहाव्या क्रमांकावर आहे. यासोबतच टीम इंडियाने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलग 10 सामने जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. हा विक्रम क्रिकेटविश्वात ऐतिहासिक मानला जात आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे सर्वात मोठे विजय

93 धावा – विरुद्ध नामिबिया (2026)
90 धावा – विरुद्ध इंग्लंड (2012)
73 धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2014)
71 धावा – विरुद्ध झिम्बाब्वे (2022)
68 धावा – विरुद्ध इंग्लंड (2024)
 
हे ही वाचा -

IND vs NAM : 12 चेंडू, 10 धावा, 5 विकेट..., लिंब टिंबू संघासमोर भारताच्या स्टार्सची हवा निघाली, पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी सूर्या अन् गंभीरचं टेन्शन वाढलं 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
NZ vs SA Semifinal T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
IND vs ENG T20 World Cup Semi Final : ईशान अन् संजू सलामीवीर, तर अभिषेक OUT? इंग्लंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11, कोच स्पष्टच बोलला
ईशान अन् संजू सलामीवीर, तर अभिषेक OUT? इंग्लंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11, कोच स्पष्टच बोलला
IND vs ENG T20 World Cup Semi Final : जिंकण्याची कोणतीच हमी नाही...; इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या कोचचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाला?
जिंकण्याची कोणतीच हमी नाही...; इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या कोचचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget