Ind U19 vs Eng U19 World Cup 2026 Final : विश्वविजेता भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफान अन् युवा गोलंदाजांची धार; इंग्लंडचा धुव्वा उडवत भारताने सहाव्यांदा कोरलं विश्वचषकावर नाव
India Won U19 World Cup 2026 Beat England Final : आयसीसी पुरुष-19 वर्षांखालील विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय साकारत सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले.

India Beat England U19 World Cup 2026 Final : हरारेच्या मैदानावर भारताच्या अंडर-१९ संघाने इतिहासाची पुनरावृत्ती केली. आयसीसी पुरुष-19 वर्षांखालील विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर तब्बल 100 धावांनी दणदणीत विजय साकारत सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी आणि वादळी 175 धावांच्या खेळीमुळे भारताने 412 धावांचा डोंगर उभा केला, ज्यापुढे इंग्लंडचा संघ पुरता कोसळला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश फलंदाज अपयशी ठरले आणि संपूर्ण संघ 312 धावांत गारद झाला. या विजयासह भारताने सहाव्यांदा (2000, 2008, 2012, 2018, 2022 आणि 2026) विश्वविजेतेपदाचा चषक उंचावून नवा इतिहास रचला आहे.
आयुष म्हात्रेची संयमी अर्धशतकी खेळी...
भारताच्या डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि आरोन जॉर्ज यांनी केली. मात्र सुरुवातीलाच भारताला धक्का बसला. आरोन जॉर्ज अवघ्या 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रेने डाव सावरत जबाबदारीने खेळ केला. आयुषने 51 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी साकारली.
वैभव सूर्यवंशीचं वादळी शतक
यानंतर भारताकडून वैभव सूर्यवंशीने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि 55 चेंडूत शानदार शतक झळकावले. वैभवने फक्त 71 चेंडूत 150 धावांचा टप्पा ओलांडत प्रेक्षकांना थक्क केले. अखेर त्याने 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने 175 धावांची अफलातून खेळी केली. या डावात त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 218.75 इतका होता.
1⃣7⃣5⃣ runs
— BCCI (@BCCI) February 6, 2026
8⃣0⃣ balls
1⃣5⃣ fours & 1⃣5⃣ sixes
A marathon knock by Vaibhav Sooryavanshi on a grand stage 👏👏
India U19 283/3 after 30 overs.
Updates ▶️ https://t.co/hisult7mtv #U19WorldCup pic.twitter.com/NL2r2ux1lT
इतर फलंदाजांचेही मोलाचे योगदान
वैभव बाद झाल्यानंतर भारतीय डावाचा वेग काहीसा मंदावला. त्यानंतर विहान मल्होत्राने 36 चेंडूत 2 चौकारांसह 30 धावा करत योगदान दिले. वेदांत त्रिवेदीनेही 36 चेंडूत 3 चौकारांसह 32 धावांची उपयुक्त खेळी केली. अभिज्ञान कुंडूने आक्रमक खेळ करत 31 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 40 धावा केल्या. याशिवाय आर. एस. अंबरीशने 18, खिलेन पटेलने 3, हिनेल पटेलने 5 धावा केल्या, तर कनिष्क चौहान नाबाद 37 धावांवर राहिला. इंग्लंडकडून जेम्स मिंटोने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्याला एलेक्स ग्रीन आणि सेबस्टियन मॉर्गन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेत चांगली साथ दिली.
Innings Break!
— BCCI (@BCCI) February 6, 2026
India U19 register the highest team total in ICC Men's U19 World Cup knockouts 👏👏
Over to the bowlers in the Final 🙌
Updates ▶️ https://t.co/hisult7mtv #U19WorldCup pic.twitter.com/8WsIo7bxkU
कॅलेब फॉकनरने शतक ठोकले, पण...
412 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. इंग्लंड संघ 40.2 षटकांत 311 धावांवर गारद झाला. वैभव सूर्यवंशी हा टीम इंडियाचा अंतिम सामन्याचा स्टार होता, त्याने फक्त 80 चेंडूत 175 धावा केल्या. दरम्यान, इंग्लंडकडून कॅलेब फॉकनरने शतक झळकावले, परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. फॉकनरने 67 चेंडूत 115 धावा केल्या.
हे ही वाचा -





















