India beat Afghanistan by 170 runs 2nd ODI : भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाने एकाच दिवसात अफगाणिस्तानला दोन वेगवेगळ्या सामन्यांत पराभवाची धूळ चारली आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय (ODI) सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला, श्रीलंका ए तिंरगा मालिकेत इंडिया ए संघाने अफगाणिस्तान ए संघाचा 101 धावांनी पराभव केला.

Continues below advertisement

शुभमन गिल आणि ईशान किशनची वादळी शतके

नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने 40.4 षटकांत सर्वबाद 402 धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या या धावसंख्येचा पाया कर्णधार शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी रचला. शुभमन गिलने 110 चेंडूंत 22 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 154 धावांची खेळी केली. तर ईशान किशनने अवघ्या 79 चेंडूंत 14 चौकार आणि 7 षटकार ठोकून 125 धावा ठोकल्या. कर्णधार रोहित शर्माने 48 धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानकडून नांगियालाई खरोतीने सर्वाधिक 4, तर रशीद खानने 3 बळी घेतले.

Continues below advertisement

अफगाणिस्तानचा डाव 232 धावांवर आटोपला

403 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. रहमानुल्लाह गुरबाज (41) आणि इब्राहिम झद्रान (21) यांनी पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. मात्र, गुरनूर ब्रारने गुरबाजला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर रहमत शाहने एकीकडून खिंड लढवत सर्वाधिक 79 धावा केल्या, परंतु त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. सेदिकुल्लाह अटलने 42 धावा केल्या. भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा संघ 44.3 षटकांत 232 धावांवर गारद झाला.

‘इंडिया ए’ चाही शानदार विजय

दुसऱ्या एका सामन्यात, श्रीलंका ए तिंरगा मालिकेतील पाचव्या सामन्यात इंडिया ए संघाने अफगाणिस्तान ए संघाला 101 धावांनी पराभूत केले. भारताने दिलेल्या 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 218 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून निशांत सिंधूने अप्रतिम गोलंदाजी करत 4 महत्त्वाचे बळी घेतले. या विजयासह इंडिया ए ने अंतिम फेरीत पोहोचण्याचा आपला दावा मजबूत केला आहे.

हे ही वाचा -

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दोषी! श्रीलंकेत नको नको ते कृत्य केलं, BCCIच्या टेबलावर पोहोचलं प्रकरण, तिलक वर्माही सुट्टी नाही