India A Squad VS Sri Lanka : ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
India A Squad For multi-day Matches In Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावरील दोन बहु-दिवसीय (multi-day) सामन्यांच्या मालिकेसाठी भारत 'अ' (India 'A') संघाची घोषणा करण्यात आली आहे.

India A Squad For multi-day Matches In Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावरील दोन बहु-दिवसीय (multi-day) सामन्यांच्या मालिकेसाठी भारत 'अ' (India 'A') संघाची घोषणा करण्यात आली आहे. यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे, तर कर्नाटकचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. या 15 सदस्यांच्या संघात जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज अकिब नबी याला देखील स्थान मिळाले आहे. हा दौरा 25 जून ते 5 जुलै या कालावधीत श्रीलंकेत पार पडणार आहे.
अकिब नबीची निवड, अनुभवी खेळाडूंचा भरणा
संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. यात डावखुरा सलामीवीर साई सुदर्शन, मधल्या फळीतील फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज यांचा प्रामुख्याने समावेश आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या अकिब नबीला या दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाले असून त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.
ऑगस्ट महिन्यात भारतीय मुख्य संघाचा श्रीलंका दौरा होणार आहे, जिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. त्या दृष्टीने भारत 'अ' संघाची ही मालिका खेळाडूंसाठी श्रीलंकेतील वातावरणाशी आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
भारत 'अ' संपूर्ण संघ (India A Squad) :
ध्रुव जुरेल (कर्णधार/यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल (उपकर्णधार), साई सुदर्शन, आयुष पांडे, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, सारांश जैन, गुरनूर ब्रार, अकिब नबी, यश ठाकूर, अंशुल कंबोज, एन. जगदीशन (यष्टिरक्षक), अमन मोखाडे, शेख रशीद, जीशान अन्सारी.
A look at India A's squad for 2️⃣ multi-day matches in Sri Lanka 🙌#SLAvINDA pic.twitter.com/QVUZlzYcHc
— BCCI (@BCCI) June 6, 2026
BCCI कडून आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा
दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासह जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय टी-20 संघाची घोषणा केली आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या निवड समितीच्या बैठकीत काही अत्यंत धाडसी आणि आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले आहेत. टी-20 विश्वचषक 2026 चा विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला धक्का देत निवड समितीने संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे सोपवली आहे.
हे ही वाचा -




















