India A Playing XI vs South Africa A for 1st Test Match : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली इंडिया ‘अ’ संघ दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध दोन सामन्यांची चार दिवसीय अनधिकृत कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका 30 ऑक्टोबरपासून (गुरुवार) बंगळुरूमध्ये सुरू होणार आहे. या मालिकेद्वारे ऋषभ पंत दीर्घ काळानंतर दुखापतीतून सावरत मैदानावर पुनरागमन करणार आहे. साई सुदर्शनला (Sai Sudharsan) उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) याचीही निवड झाली आहे. पण त्याला पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

Continues below advertisement

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली उतरणार इंडिया ‘अ’ संघ

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पंतच्या नेतृत्वाखाली भारत विजयाच्या उद्दिष्टाने मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी संघ मजबूत प्लेइंग इलेव्हनसह उतरू शकतो. भारतासाठी देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि एन. जगदीशन सलामीची जबाबदारी पार पाडू शकतात. एन. जगदीशन हा एक विकेटकीपर असून अलीकडेच उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला आहे. या मालिकेसाठी साई सुदर्शन याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, आणि तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल अशी शक्यता आहे. 

Continues below advertisement

चौथ्या स्थानावर रजत पाटीदार फलंदाजी करेल, जो सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे. पाचव्या क्रमांकावर स्वतः कर्णधार ऋषभ पंत मैदानात उतरणार असून, तो विकेटकीपिंगची जबाबदारीही सांभाळेल. संघात ऑलराउंडर म्हणून हर्ष दुबे, तनुष कोटियान, आणि मानव सुथार यांचा समावेश होऊ शकतो, तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अंशुल कंबोज आणि यश ठाकुर यांच्यावर असणार आहे. तसेच, आयुष बदोनीलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते, जो स्पिन ऑलराउंडर म्हणून संघात योगदान देऊ शकतो.

पहिल्या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग-11 : देवदत्त पडिक्कल, एन. जगदीसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, अंशुल कंबोज, यश ठाकूर, आयुष बडोनी.

पहिल्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), आयुष म्हात्रे, एन. जगदीसन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, अंशुल कंबोज, यश ठाकूर, आयुष बडोनी, सरांश जैन.

दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ

ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), केएल राहुल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, खलील अहमद, गुरनूर ब्रार, अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाशदीप.