एक्स्प्लोर

India vs Pakistan : वर्ल्डकपच्या IND vs PaK सामन्यापूर्वी टीम इंडियाने विजयाचा गुलाल उधळला; आशिया कपमध्ये भारताच्या लेकींनी पाकिस्तानला धूळ चारली

India A beat Pakistan A by 8 wickets Asia Cup 2026 : आज क्रिकेट विश्वाचे लक्ष कोलंबोकडे लागलेले असतानाच, भारताच्या युवा महिला ब्रिगेडने आधीच विजयाचा गुलाल उधळला आहे.

India A beat Pakistan A Womens Rising Stars Asia Cup 2026 : आज क्रिकेट विश्वाचे लक्ष कोलंबोकडे लागलेले असतानाच, भारताच्या युवा महिला ब्रिगेडने आधीच विजयाचा गुलाल उधळला आहे. एसीसी महिला रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये भारतीय महिला अ संघाने पाकिस्तान-अ संघाचा 8 विकेट्सनी पराभव केला. या विजयामुळे आज सायंकाळी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी चाहत्यांचा उत्साह चांगलाच वाढला आहे.

एसीसी महिला रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये पहिल्या सामन्यात यूएईकडून झालेल्या धक्कादायक पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत होती, मात्र या विजयाने संघाने जोरदार उत्तर दिले. या सामन्यात वृंदा दिनेश हिने अफलातून फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिने फक्त 29 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा ठोकल्या. तिच्या आक्रमक खेळीमुळे भारताने लक्ष्य सहज गाठले आणि स्पर्धेतील आपल्या विजयाचे खाते उघडले. 

गोलंदाजांनी मोडले पाकिस्तानचे कंबरडे

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी सावरण्याची संधीच दिली नाही. अचूक टप्पा आणि भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा संपूर्ण संघ 20 षटकेही खेळू शकला नाही. 18.5 षटकांत अवघ्या 93 धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला. भारतासमोर विजयासाठी 94 धावांचे किरकोळ लक्ष्य होते.

वृंदा दिनेशची वादळी अर्धशतक...

94 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर वृंदा दिनेशने पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. तिने अवघ्या 29 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावांची स्फोटक खेळी केली. वृंदाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भारताने 11 व्या षटकातच विजय मिळवला.

आता लक्ष कोलंबोकडे, सायंकाळी 7 वाजता हाय-व्होल्टेज ड्रामा!  

महिला संघाने मिळवलेल्या या विजयाने भारतीय चाहत्यांना जणू विजयाची नांदी दिली आहे. आज 15 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानचे मुख्य संघ आमनेसामने येणार आहेत.

हे ही वाचा -

T20 World Cup 2026  : पॉइंट्स टेबलमध्ये भूकंप! वेस्ट इंडिजची गाडी सुसाट, विजयी हॅट्रिक अन् सुपर-8 चं पहिलं तिकीट कन्फर्म, कोणाचा पत्ता कट?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India won T20 World Cup : सलग दुसऱ्यांदा भारतानं कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव, संघाला नेमकं किती मिळालं बक्षीस 
India won T20 World Cup : सलग दुसऱ्यांदा भारतानं कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव, संघाला नेमकं किती मिळालं बक्षीस 
T20 World Cup 2026 Team India Celebration : विजयी ट्रॉफी उचलताच टीम इंडियाचे भन्नाट सेलीब्रेशन, सूर्याने नेमकं काय केलं?, पाहा संपूर्ण Video
विजयी ट्रॉफी उचलताच टीम इंडियाचे भन्नाट सेलीब्रेशन, सूर्याने नेमकं काय केलं?, पाहा संपूर्ण Video
पुन्हा एकदा चॅम्पियन! अहमदाबादमध्ये मिळालेला विजय हा अभूतपूर्व, विराट कोहलीकडून खास शब्दात भारतीय संघाचं कौतुक
पुन्हा एकदा चॅम्पियन! अहमदाबादमध्ये मिळालेला विजय हा अभूतपूर्व, विराट कोहलीकडून खास शब्दात भारतीय संघाचं कौतुक
Abhishek Sharma Ind vs Nz : स्वतःवर विश्वास उरला नव्हता, पण... वर्ल्डकप जिंकताच अभिषेक शर्मा मनातलं सगळं बोलला; गौतम गंभीरबाबत मोठा खुलासा
स्वतःवर विश्वास उरला नव्हता, पण... वर्ल्डकप जिंकताच अभिषेक शर्मा मनातलं सगळं बोलला; गौतम गंभीरबाबत मोठा खुलासा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget