IND vs WI Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्याच्या कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. डोमिनिकाच्या विंडसर पार्कमध्ये भारत आणि विंडिजचे खेळाडू भिडणार आहेत. या सामन्यात यशस्वी जायस्वाल पदार्पण करणार आहे. रोहित शर्मा याने याबाबातची माहिती दिल्याचे वृत्त आहे. विडिंज दौऱ्यात चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले होते. भारतीय संघात काही युवा खेळाडूंना स्थान देण्यात आलेय. बुधवारी यशस्वी जायस्वाल पदार्पण करणार आहे.
सलामीला नवी जोडी, गिल तिसऱ्या क्रमांकावर -
वेस्ट इंडिजविरोधात भारतीय संघ सलामीला नवीन जोडी मैदानात उतरवणार आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल सलामीला खेळणार आहेत. त्यामुळे शुभमन गिल याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे लागणार आहे. रोहित शर्माने यशस्वी जायस्वाल पदार्पण करणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय शुभमन गिल तिसऱ्या तर यशस्वी सलामीला खेळणार असल्याचेही सांगितले.
दोन फिरकी गोलंदाजासह उतरणार भारत -
भारतीय संघात दोन फिरकी गोलंदाज खेळणार असल्याचेही रोहित शर्माने सांगितेल. रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विन प्लेईंग 11 मध्ये खेळणार आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आर. अश्विन याला संघाबाहेर ठेवले होते. त्यामुळे रोहित शर्मा आणि बीसीसीआयवर टीका झाली होती. भारतीय संघ आता दोन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे.
वेगवान गोलंदाज कोण कोण?
मोहम्मद शामी, उमेश यादव यांना आराम देण्यात आला आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज याच्या खांद्यावर आहे. त्याशिवाय मुकेश कुमार आणि जयदेव उनादकट आणि शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी चमूचा भाग आहेत. सिराजशिवाय कोणत्या दोन वेगवान गोलंदाजाला भारतीय संघात स्थान मिळणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विकेटकिपरचा प्रश्न कायम?
इशान किशन की केएस भरत ... विकेटकिपर म्हणून कुणाला खेळणावर याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळाली नाही. सुत्रांच्या वृत्तानुसार, ईशान किशन याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलं जाऊ शकते. भरत याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये फलंदाजीत अपयश आले होते. त्यामुळे इशान किशनला संधी दिली जाऊ शकते.
भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.
वेस्ट इंडिजचा कसोटी संघ -
क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, तेजनारायण चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ डिसिल्वा, शेनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन.