एक्स्प्लोर

Ind vs Wi 2nd Test : एक-दोन-तीन... पोरीने कानाखाली मारल्या, Ind vs WI च्या लाईव्ह सामन्यात मैदानात काय घडलं?, VIDEO

चौथ्या दिवशी अरुण जेटली स्टेडियमवर घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

India vs West Indies 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळला जात आहे. चौथ्या दिवशी अरुण जेटली स्टेडियमवर घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी स्टँडमध्ये बसलेल्या एका मुलाला एकदा नाही तर तब्बल तीन-चार वेळा कानाखाली मारताना दिसत आहे. आजूबाजूचे प्रेक्षक आश्चर्यचकित झाले, तर काहींनी हा प्रसंग मोबाईलमध्ये टिपला. ही घटना वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावातील 89व्या षटकानंतर घडली. पण त्यांची मस्ती चालू होती. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

दुसरीकडे सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, वेस्टइंडिज क्रिकेट संघाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जबरदस्त पुनरागमन केले. पहिल्या डावात खराब कामगिरी केल्यानंतर वेस्टइंडिजने दुसऱ्या डावात अशी झुंज दिली की टीम इंडियाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. सामना कोण जिंकेल हे अजून सांगता येणार नाही, पण वेस्टइंडिजने ते करून दाखवले आहे जे त्यांनी गेल्या 12 वर्षांत कसोटीत केले नव्हते.  

कसोटीत जेव्हा एखाद्या संघाला फॉलोऑनचा सामना करावा लागतो, तेव्हा बहुतांश वेळा तो सामना डावाने हरावा लागतो. सलग दोनदा फलंदाजी करणे सोपे नसते. वेस्टइंडिजलाही याच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. शेवटचं असं 2013 साली झालं होतं, जेव्हा न्यूझीलंडविरुद्ध फॉलोऑन मिळाल्यानंतर त्यांनी सामना डावाने न हरता ड्रॉ केला होता. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी पुन्हा एकदा त्यांनी असा दिवस पाहिला आहे.

जॉन कॅम्पबेल आणि शाई होपचा धमाका

भारतीय संघाने पहिल्या डावात 5 गडी गमावून 518 धावा करत डाव घोषित केला. त्यानंतर वेस्टइंडिजची पहिली खेळी 248 धावांवर संपली. कर्णधार शुभमन गिलने पुन्हा फलंदाजी न करता वेस्टइंडिजला फॉलोऑन दिला. जरी दोन गडी लवकर गमावले गेले असले तरी जॉन कॅम्पबेल आणि शाई होपने पुनरागमन केले. कॅम्पबेलने आपले पहिले कसोटी शतक झळकावले, तर शाई होपने कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले.

दुसऱ्या डावात वेस्टइंडिजने 270 धावा गाठताच त्यांनी भारताचा स्कोर बरोबरीत आणला. आणखी एक धाव मिळताच वेस्टइंडिजने आघाडी घेतली आणि याच क्षणापासून निश्चित झालं की ते आता हा सामना डावाने हरणार नाहीत. तरीही सामना अजून पूर्ण व्हायचा आहे, आणि अखेरचा दिवस बाकी असल्याने काहीही घडू शकतं.

हे ही वाचा -

Rohit Sharma VIDEO: श्रेयस अय्यरने स्टेजवर ट्रॉफी स्वीकारुन खाली येताच एक चूक केली, पण हिटमॅन रोहितने क्षणात पाहिलं अन्..! हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast : 'ती कार आमची नाही', Pulwama तील Amir-Umar च्या कुटुंबीयांचा दावा, तिघे ताब्यात
Delhi Blast: दिल्ली स्फोटावर Amit Shah यांची उच्चस्तरीय बैठक, NIA चे DG Sadanand Date उपस्थित.
Delhi Blast Probe: दिल्ली स्फोटात श्राप्नेलचा वापर नाही, पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा
Dharmendra Health Update : अभिनेते Dharmendra यांची प्रकृती स्थिर, मुलगी Esha Deol ने दिली माहिती
Delhi Blast: दिल्लीतील स्फोटानंतर America सतर्क, नागरिकांसाठी Security Alert जारी.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
Embed widget