IND vs WI 1st Test Match Day 1 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला आहे. सामन्यापूर्वी नाणेफेक झाली असून, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपली अंतिम प्लेइंग-11 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पाहूया, कोणत्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

Continues below advertisement

Continues below advertisement

भारत वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्यांदा गोलंदाजी करणार

टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबाद कसोटीत पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलची नशीबाने पुन्हा साथ दिली नाही, कारण तो नाणेफेक हरला. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सकाळी 9.30 वाजता सुरू झाला आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने ही मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे, आणि ते विजयासह मालिकेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यात भारत निश्चितच प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरला आहे.

कर्णधार गिलचा मोठा निर्णय

भारतीय संघाने तीन फिरकीपटू, दोन वेगवान गोलंदाज आणि नितीश रेड्डी या वेगवान गोलंदाजाला मैदानात उतरवले. हे तीन फिरकीपटू रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव आहेत, तर दोन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज आहेत. भारतीय संघाने अपोलो टायर्सची नवीन जर्सी घालून सामन्यात प्रवेश केला. 

भारतीय संघाची प्लेइंग-11 : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज संघाची प्लेइंग-11 : रोस्टन चेस (कर्णधार), तेजनारायण चंद्रपॉल, जॉन कॅम्पबेल, ॲलिक अथानाझे, ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, जोहान लिन, जेडेन सील्स.

हे ही वाचा - 

Mohsin Naqvi Asia Cup Trophy: मी माफी मागितली नाही, ट्रॉफी पाहिजे तर...; मोहसीन नक्वी पुन्हा बरळला, काय काय म्हणाला?