IND vs USA : विजयी श्रीगणेशा! सूर्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा अमेरिकेवर शानदार विजय

India vs USA Score Updates In Marathi : टी-20 वर्ल्डकप 2026चा थरार सुरू झाला असून टीम इंडिया आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.

Advertisement

किरण महानवरLast Updated: 07 Feb 2026 10:48 PM

पार्श्वभूमी

India vs USA Score Updates T20 World Cup 2026 In Marathi : टी-20 वर्ल्डकप 2026चा थरार सुरू झाला असून टीम इंडिया आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. हा...More

IND vs USA : विजयी श्रीगणेशा! सूर्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा अमेरिकेवर शानदार विजय

भारताने दणदणीत विजयाने टी-20 वर्ल्ड कप 2026 मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत टीम इंडियाने अमेरिकेचा 29 धावांनी पराभत केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 161 धावा केल्या. सुरुवातीला अडचणीत सापडलेल्या भारताला कर्णधार सूर्यकुमार यादवने सावरलं. सूर्यानं जबाबदारी घेत 84 धावांची झंझावाती, सामना जिंकवणारी खेळी केली. त्याच्या फलंदाजीमुळे वानखेडेवर पुन्हा एकदा सूर्या तळपला. 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकन संघाला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आवळा घातला. नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्याने यूएसएची फलंदाजी कोलमडली. अखेरीस अमेरिका 20 षटकांत 132 धावांपर्यंतच मजल मारू शकली. या विजयासह भारताने वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात केली.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.