पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. भारताचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करतोय. तर, श्रीलंका होमग्राऊंडवर चारिथ असलंका (Charith Asalanka) याच्या नेतृत्त्वात मैदानात उतरणार आहे. विशेष बाब म्हणजे दोन्ही संघांना या मालिकेसाठी नवे प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. भारताच्या प्रशिक्षक पदावर गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, श्रीलंकेचा मुख्य प्रशिक्षक म्हणून सनथ जयसूर्या जबाबदारी पार पाडणार आहे.
रोहित शर्माचा वारसा चालवण्याचं सूर्यापुढं आव्हान
रोहित शर्मानं भारताला टी 20 वर्ल्डकपचं विजेतेपद मिळवून दिलं आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं झिम्बॉब्वे विरुद्धची मालिका जिंकली. आता श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकण्याचं आव्हान सूर्यकुमार यादवसमोर असेल.
सूर्यकुमार यादव भारताच्या टी 20 संघाचा पूर्णवेळ कॅप्टन म्हणून मैदानात उतरेल. शुभमन गिल उपकर्णधार असेल. हार्दिक पांड्या देखील संघात असणार आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ टी 20 मालिकेपासून सुरु होत आहे.
भारत-श्रीलंका यांच्यातील सामन्यांचं थेट प्रक्षेपण कुठं होणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेचं आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचं प्रक्षेपण टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवरुन करण्यात येईल. मोबाईलवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना सोनी लाईव्ह ॲपवर ही मालिका पाहता येणार आहे. मोबाईलवर सामना पाहण्यासाठी तुम्हाला सोनी लाईव्हचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
भारताचा संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या , शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ :
चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल झेनिथ परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलेज, महेश वेलेज, चामिंडू विक्रमसिंघे, मथिशा पाथिराना, नुवान तुषारा(दुखापतीमुळं मालिकेबाहेर), दुष्मंथा चमीरा, (दुखापतीमुळं मालिकेबाहेर)आणि बिनुरा फर्नांडो.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
27 जुलै - 1ली टी-20 (पल्लेकेले)
28 जुलै - दुसरी टी-20 (पल्लेकेले)
30 जुलै - तिसरी टी-20 (पल्लेकेले)
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)
4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)
7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)
संबंधित बातम्या :