IND vs SL 1st Test DAY-5 : गॉलमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय; श्रीलंकेला धूळ चारत मालिकेत घेतली आघाडी
Sri Lanka vs India 1st Test DAY-5 Highlights Update : भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने आपला दबदबा कायम ठेवला आहे.

पार्श्वभूमी
IND vs SL 1st Test Day-5 Match Score : भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या या...More
भारतीय संघाने गॉलवर कब्जा केला आहे. तिथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्यांनी श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला.
भारताने श्रीलंकेला 165 धावांनी पराभूत केले. या विजयामुळे भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
ही 600 वी कसोटी असल्याने, गॉलमधील या विजयाला भारतीय संघासाठी अधिक महत्त्व आहे.
भारताने गॉल कसोटी जिंकण्यासाठी 372 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु श्रीलंकेला ते लक्ष्य गाठण्यात अपयश आले.
रवींद्र जडेजाने भारताला दिवसातील पहिली आणि एकूण पाचवी विकेट मिळवून दिली.
जडेजाने श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्व्हाला मानव सुथारकरवी झेलबाद करत माघारी धाडले.
धनंजयने 151 चेंडूंचा सामना करत 59 धावांची संयमी खेळी केली.
त्याच्या विकेटनंतर आता सोनल दिनुषासोबत डाव सावरण्यासाठी निरोशन डिकवेला मैदानात उतरला आहे.