IND vs SL 1st T20: दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांच्या खेळीच्या बळावर भारतानं निर्धारित 20 षटकात 162 धावांपर्यंत मजल मारली आहे. श्रीलंकेला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं आहे. सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि शुभमन गिल यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही.
दिपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी मोक्याच्या क्षणी भारताची धावसंख्या वाढवली. दीपक हुड्डानं 23 चेंडूत 41 धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलनं 20 चेंडूत 31 धावांची खेळी केली. इशन किशननं 29 चेंडूत 37 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्यानं 27 चेंडूत 29 धावांची खेळी केली. वानिन्दु हसरंगा, चामिका करुणारत्ने, महेश तिक्ष्णा, आणि दिलशान मदुशंका यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
श्रीलंका संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. पदार्पण करणाऱ्या शूभमन गिल याला महेश तिक्ष्णा याने सात धावांवर माघारी धाडले. त्यानंतर फॉर्मात असणाऱ्या सूर्यकुमार यादव याला चामिरा करुणारत्ने याने तंबूचा रस्ता दाखवला. संजू सॅमसनलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. संजू पाच धावा काढानू माघारी परतला. इशान किशन आणि हार्दिक पांड्यानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण इशान किशन आणि हार्दिक एकापाठोपाठ एक बाद झाल्यानंतर भारताच्या अडचणी वाढल्या. अखेर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरत भारताला सन्माजनक धावसंख्या उभारुन दिली.
श्रीलंकेचा संघ
पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजय डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कप्तान), वानिन्दु हसरंगा, चामिका करुणारत्ने, महेश थीक्षणा, कसुन रजिता आणि दिलशान मदुशंका.
कसा आहे भारतीय संघ -
शुभमन गिल, इशान किशन (विकेटकिपर), सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, दीपक हुड्डा, हर्षल पटेल, शिवम मावी, युजवेंद्र चहल, उमरान मलिक