INDW vs SAW World Cup Final 2025 Rohit Sharma: जो खो गया मैं उस को भुलाता चला गया...; भारताने विश्वचषक जिंकताच रोहित शर्मा भावूक, आकाशाकडे पाहिलं अन्..., Video पाहून भारतीयांच्या डोळ्यात पाणी!
INDW vs SAW World Cup Final 2025 Rohit Sharma Video: महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा देखील समावेश होता.

INDW vs SAW World Cup Final 2025: आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात (INDW vs SAW World Cup Final 2025) भारतानं दक्षिण आफ्रिकेवर (India beat South Africa Women World Cup 2025 Final) विजय मिळवला आहे. भारतानं नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं पहिल्यांदा आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या या विजयात तीन खेळाडूंची कामगिरी महत्त्वाची ठरली. शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा आणि अमनजोत कौरची फील्डिंग महत्वाची ठरली.
The moment all of India has been waiting for as ICC Chairman @JayShah hands India captain Harmanpreet Kaur the trophy 🏆#CWC25 pic.twitter.com/RDcQ3pVtl7
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 2, 2025
महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुलवार्टनं शतकी खेळी केली पण एका बाजूनं अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचे प्रयत्न अपुरे ठरले. आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली.
Moments etched in history 🤩 #CWC25 pic.twitter.com/HCsQcgacH6
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 2, 2025
रोहित शर्मा भावूक, टाळ्या वाजवत कौतुक- (Rohit Sharma)
महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा देखील समावेश होता. सामन्याच्या सुरुवातीपासूनच रोहित शर्मा डी.वाय.पाटील स्टेडियमवर पोहोचला होता. यावेळी त्याची पत्नी रितिका सजदेह देखील उपस्थित होती. ज्यावेळी भारताच्या दिप्ती शर्माने दक्षिण अफ्रिकेची दहावी विकेट घेत विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर रोहित शर्मा स्टँडवर पुढे येत टाळ्या वाजवून खेळाडूंचं कौतुक केलं. यावेळी रोहित शर्मा थोडा भावूक झाल्याचंही दिसून आले. टाळ्या वाजवत रोहित शर्मा आकाशाकडे बघत राहिला आणि काहीतरी चुकचुकला. (व्हिडीओवरुन देवाचे आभार मानल्याचे दिसत आहे) यादरम्यानचा रोहित शर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्माचा हा व्हिडीओ पाहून भारतीय नागरिक देखील भावूक होत आहे. दरम्यान, भारतात झालेल्या 2023 च्या वनडे विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत जेतेपद पटकावले होते. यावेळी रोहित शर्मासह सर्व खेळाडू आणि भारतीय भावूक झाले होते.
View this post on Instagram
25 वर्षांनंतर मिळाला एक नवा विजेता- (India Womens Win World Cup 2025)
पूर्वी, फक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडनेच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. महिला एकदिवसीय क्रिकेटला शेवटचा नवीन विजेता 2000 मध्ये मिळाला होता, जेव्हा न्यूझीलंडने जेतेपद पटकावले. त्यापूर्वी आणि तेव्हापासून, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विजेते राहिले आहेत. आता, 25 वर्षांनंतर, महिला एकदिवसीय क्रिकेटला भारतात एक नवा विजेता मिळाला आहे.
















