एक्स्प्लोर

Ind Vs SA T 20 World Cup: पाकिस्तानी खेळाडूने टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाला, 'आता रोहित-विराट संघात नाहीत, त्यांच्याकडे...'

Ind Vs SA T 20 World cup 2026: दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताचा दारुण पराभव केला होता. भारतीय संघ सुपर 8 फेरीतच बाहेर पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी खेळाडूने वास्तव दाखवलं

Ind Vs SA: ट्वेन्टी-20 विश्वचषकातील सुपर-8 फेरीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) प्रथम फलंदाजी करताना 188 धावांचे आव्हान भारतीय संघासमोर ठेवले होते. मात्र, कागदावर बलवान असलेली भारतीय फलंदाजी (Indian Batting) पत्त्यासारखी कोसळली आणि अवघ्या 111 धावांमध्ये भारताचे सगळे गडी बाद झाले. या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याने भारतीय संघाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. त्याने भारतीय संघ नेमका कुठे कमी पडला, यावर बोट ठेवले. (T 20 World Cup 2026)

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ पहिल्यांदाच धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि उघडा पडला. आता भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली नाहीत, हा पूर्वीचा संघ राहिलेला नाही, ही गोष्ट अनेकजण विसरत आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे परिस्थिती ओळखून त्याप्रमाणे खेळायचे, आपल्या खेळात बदल करायचे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने तीन डावखुरे फलंदाज मैदानात पाठवले. आफ्रिकेने त्यांच्याविरुद्ध ऑफ स्पिनर लावले. याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला, असे मोहम्मद आमीर याने म्हटले.

मोहम्मद आमीर याने यापूर्वीही अभिषेक शर्माचा फॉर्म आणि भारतीय संघाच्या कामगिरीबाबत टिप्पणी केली होती. त्याने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाची फलंदाजी तितकीशी ताकदवान नसल्याकडे लक्षही वेधले होते. पाकिस्तानविरुद्धचा सामना सोडून भारताच्या सगळ्या मॅच बघा. भारतीय फलंदाजी पत्त्यासारखी कोसळत आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज सध्याच्या घडीला ज्याप्रकारे खेळत आहेत, ते कुठल्याही टीमला हरवू शकतात. त्यांच्याकडे परिपूर्ण अशी वेगवान आणि फिरकी गोलंदाजी आहे. त्यांचे सगळे फलंदाजी फॉर्ममध्ये आहेत. या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना होईल, असे भाकित मोहम्मद आमीर याने वर्तवले होते. हे भाकीत आता खरे ठरण्याची दाट शक्यता दिसत आहे.

Ind Vs Pak Abhishek Sharma: अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर...'

मोहम्मद आमीर याने भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा याच्याबाबत केलेले वक्तव्यही प्रचंड गाजले होते. अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर आहे. त्याला एका साध्या प्लाननेही बाद करता येईल. अभिषेकमध्ये सातत्य नाही आणि तो तांत्रिकदृष्ट्या चांगला फलंदाज नाही. अभिषेक आठ पैकी एका सामन्यात कामगिरी करतो, तर इतर सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारू शकला नाही, असे मोहम्मद आमीर याने म्हटले होते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by cricket trending video (@crixo_oxo)

आणखी वाचा

वेस्ट इंडिज टेबल टॉपर, टीम इंडिया खालून दोन नंबर; सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 3 पॉईंट मध्ये समजून घ्या गणित

काळ्या मातीचा 'काळा' फेरा! नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन वर्षांत दुसऱ्यांदा टीम इंडियावर दु:खाचा डोंगर, कर्णधार सूर्याचा अशुभ योगायोग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Prize Money Team India: टीम इंडियाला बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर; कुणाला किती कोटी मिळणार?, A टू Z माहिती
टीम इंडियाला बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर; कुणाला किती कोटी मिळणार?, A टू Z माहिती
Sanju Samson T20 World Cup 2026: हातात ट्रॉफी घेऊन शांत कोपऱ्यात बसला; संजू सॅमसनचा साधेपणा सर्वांना भावला, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
हातात ट्रॉफी घेऊन शांत कोपऱ्यात बसला; संजू सॅमसनचा साधेपणा सर्वांना भावला, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Team India Victory Parade In Mumbai: विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
Embed widget