Indias Tour of South Africa 2023-24 : विश्वचषकानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन टी20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. 10 डिसेंबर 2023 ते 7 जानेवारी 2024 यादरम्यान भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असेल. 

तीन टी 20 मालिकेने भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अर्तंर्गत भारतीय संघ दोन कसोटी सामने दक्षिण आफ्रिकामध्ये खेळणार आहे.  गांधी-मंडेला चषकासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात फ्रीडम सिरीज होईल. (Freedom Series for Gandhi-Mandela Trophy )

भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

India’s tour of South Africa, 2023-23 (Senior Men)

Day

Date

Match

Venue

रविवारी

10 डिसेंबर 2023

पहिला टी 20 सामना

डरबन

मंगळवार

12 डिसेंबर 2023

दुसरा टी 20 सामना

जिकेबराह

Gqeberha

गुरुवार

14 डिसेंबर 2023

3rd T20I

जोहान्सबर्ग

रविवार

17 डिसेंबर 2023

1st ODI

जोहान्सबर्ग

मंगळवार

19 डिसेंबर 2023

2nd ODI

जिकेबराह

Gqeberha

गुरुवार

21 डिसेंबर 2023

3rd ODI

पार्ल

मंगळवार

26 डिसेंबर 2023 ते 30 डिसेंबर 2023 

पहिला कसोटी सामना

सेंच्युरियन

बुधवार

03 जानेवारी 2024 ते 07 जानेवारी 2024

दुसरा कसोटी सामना

केपटाऊन

Cape Town

भारतामध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान विश्वचषक होणार आहे. विश्वचषकानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. वेस्ट इंडिजविरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेनंतर भारत थेट वर्षाअखेरीस कसोटी सामना खेळणार आहे.