Continues below advertisement

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून गुवाहाटी येथे सुरु झाली आहे. या कसोटीनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. दुसऱ्या कसोटीत भारताचं कर्णधारपद रिषभ पंतकडे सोपवण्यात आलं आहे. एकदिवसीय मालिकेसाठी शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळं उपलब्ध नसल्यास कर्णधारपद कोणाकडे दिलं जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताचा माजी उपकर्णधार के. एल. राहुलचं नाव सध्या चर्चेत आहे.

भारताचा कॅप्टन उपकॅप्टन दोघेही दुखापतग्रस्त

भारताचा कॅप्टन शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता. तर, उपकॅप्टन श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेत कॅच पकडताना दुखापत झाली होती. त्यामुळं दोघेही दुखापतग्रस्त झाल्यानं कर्णधारपद कोणाकडे सोपवलं जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Continues below advertisement

के.एल. राहुलचं नाव आघाडीवर

रोहित शर्माच्या जागी वनडेचं कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवल्यानंतर निवड समिती पुन्हा त्याच्या नावाचा विचार करण्याची शक्यता कमी दिसून येते. त्यामुळं अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समिती रोहित शर्माऐवजी के.एल. राहुलच्या नावाला प्राधान्य दिलं जाऊ शकतं. के.एल. राहुल भारताच्या कसोटी, वनडे आणि टी 20 संघाचा उपकर्णधार होता.

के.एल. राहुल भारताच्या वनडे संघाचा सदस्य असून विकेटकीपर म्हणून देखाल जबाबदारी पार पाडतो. केएल राहुलला टीम मॅनेजमेंटनं चॅम्पियन्स ट्रॉफीत रिषभ पंत ऐजी संधी दिली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध के. एल. राहुल ला कॅप्टन म्हणून संधी दिली जाऊ शकते.

भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांचं वेळापत्रक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर वनडे मालिका सुरु होणार आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात 30 नोव्हेंबरपासून होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबरला रांचीमध्ये होणार आहे. तर, दुसरा एकदिवसीय सामना 3 डिसेंबरला रायपूरमध्ये होणार आहे. तर, तिसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथे 6 डिसेंबरला होणार आहे.

दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघाकडून खेळताना दिसतील.