एक्स्प्लोर

IND vs SA LIVE Score: टीम इंडियाची दमदार गोलंदाजी; दक्षिण आफ्रिकेचा संघ 83 धावांत गुंडाळला, जाडेजाचे पाच बळी

World Cup 2023: टीम इंडियानं  क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि सलग सात सामने जिंकले. आता भारतीय क्रिकेट संघ आपला पुढचा सामना आज (5 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.

Key Events
IND vs SA LIVE Score Updates Nov 5 ODI World Cup 2023 India vs South Africa Match Highlights Scorecard Rohit Sharma Virat Kohli Temba Bavuma IND vs SA LIVE Score: टीम इंडियाची दमदार गोलंदाजी; दक्षिण आफ्रिकेचा संघ 83 धावांत गुंडाळला, जाडेजाचे पाच बळी
IND vs SA LIVE Score, World Cup 2023:

Background

IND vs SA LIVE Score, World Cup 2023: टीम इंडियानं (Team India) क्रिकेट विश्वचषक 2023 (World Cup) मध्ये चमकदार कामगिरी केली आणि सलग सात सामने जिंकले. आता भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आपला पुढचा सामना आज (5 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 2 वाजता सामना सुरू होईल. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. अशा परिस्थितीत अव्वल दोन संघांमधील हा सामना 'फायनलपूर्वीचा अंतिम सामना' मानला जात आहे.

आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा 'बर्थडे बॉय' विराट कोहलीवर असतील. कोहलीला सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करायची आहे. मात्र, आफ्रिकन संघाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँडविरुद्धचा एक सामना वगळता 6 सामने जिंकले आहेत. तर, टीम इंडियानं आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करत सर्व सामने जिंकले आहेत. तसेच, वर्ल्डकपच्या पॉईंट टेबलमध्ये सध्या टीम इंडिया पहिल्या स्थानावर कायम आहे. 

टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल? 

ईडन गार्डन्सचा पिच फलंदाजांसाठी उपयुक्त ठरतो, पण नंतर या पिचची स्पिनर्सलाही मदत होते. अशा परिस्थितीत टीम इंडिया या सामन्यात अतिरिक्त स्पिनर फिरकी गोलंदाज (रविचंद्रन अश्विन) खेळवतो की नाही हे पाहणे बाकी आहे. अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ सुरुवातीचे सामने खेळता आले. मात्र, गेल्या तीन सामन्यांमध्ये भारतीय संघाने मैदानात उतरलेल्या प्लेईंग-11 ने चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल न झाल्यास नवल वाटणार नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियानं आजवर स्पर्धेतील एकही सामना गमावलेला नाही. कोहली (442 धावा) आणि रोहित (402 धावा) जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, तर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनीही धमाकेदार खेळी करत . या वर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्ध 92 धावा करत प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. श्रेयस अय्यरनंही 82 धावा करून टीम इंडियाच्या फलंदाजांची जादू दाखवून दिली. 

 

डिकॉकला लवकर माघारी धाडणं गरजेचं 

दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचं झालं तर, शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकचा (545 धावा) फॉर्म गोलंदाजांसाठी फार वाईट ठरतो. डीकॉकला रोखणं भल्या भल्या गोलंदाजांसाठी अवघड होतं. सध्याच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 5 वेळा 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एडन मार्कराम (7 डावांत 362 धावा), रॅसी व्हॅन डर डुसेन (7 डावांत 353 धावा) आणि हेनरिक क्लासेन (315 धावा) यांचं योगदानही महत्त्वाचं आहे. तसेच, साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजीत भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्याची क्षमता आहे. मार्को जॅनसेननं आतापर्यंत 7 सामन्यात सर्वाधिक 16 विकेट घेतल्या आहेत. 

भारत-दक्षिण आफ्रिकेचा H2H रेकॉर्ड 

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. या कालावधीत दक्षिण आफ्रिकेनं 3 आणि टीम इंडियानं 2 विजय मिळवले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 90 सामन्यांपैकी टीम इंडियानं 37 आणि दक्षिण आफ्रिकेनं 50 सामने जिंकले आहेत, तर तीन सामने अनिर्णित राहिले.

टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग-11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य प्लेईंग-11

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.

20:33 PM (IST)  •  05 Nov 2023

टीम इंडियाची दमदार गोलंदाजी; दक्षिण आफ्रिकेचा संघ 83 धावांत गुंडाळला, जाडेजाचे पाच बळी

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. बलाढ्य समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघा 83 धावांत गुंडाळले. 

20:00 PM (IST)  •  05 Nov 2023

आफ्रिकेला सातवा धक्का

76 धावांत आफ्रिकेला सातवा धक्का बसलाय. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs DC Live Update : प्लेऑफच्या शर्यतीत ट्विस्ट! धर्मशालात आज पंजाब-दिल्ली भिडणार, एका पराभवाने गणित बिघडणार?
PBKS vs DC IPL 2026 Live Update : प्लेऑफच्या शर्यतीत ट्विस्ट! धर्मशालात आज पंजाब-दिल्ली भिडणार, एका पराभवाने गणित बिघडणार?
BCCI Fined RCB coach Andy Flower : RCBच्या विजयानंतरही मोठा धक्का! हेड कोच फ्लॉवरवर कारवाई, कारण ऐकून चाहत्यांनाही धक्का, नेमकं काय घडलं?
RCBच्या विजयानंतरही मोठा धक्का! हेड कोच फ्लॉवरवर कारवाई, कारण ऐकून चाहत्यांनाही धक्का, नेमकं काय घडलं?
Hardik Pandya Fact Check : हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं, फोटोही हटवले; सोशल मीडियावर दावा, नेमकं सत्य काय?
हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं, फोटोही हटवले; सोशल मीडियावर दावा, नेमकं सत्य काय?
Virat Kohli Celebration : मुंबई IPL मधून बाहेर होताच विराट कोहली मैदानात सुटला पळत... सेलिब्रेशन पाहून चाहतेही अवाक्, शेवटच्या चेंडूवर नेमकं काय घडलं?
मुंबई IPL मधून बाहेर होताच विराट कोहली मैदानात सुटला पळत... सेलिब्रेशन पाहून चाहतेही अवाक्, शेवटच्या चेंडूवर नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Nandurbar Fire News: नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
Mumbai Crime News: पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
Embed widget