= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा; जैस्वालचं शतक, रोहित-विराटच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 2-1 ने मालिका जिंकली दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 271 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे टीम इंडियाने 39.5 षटकांत पूर्ण केले.
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी केली.
रोहितने या डावात 73 चेंडूत 75 धावा केल्या, त्यात 3 षटकार आणि 7 चौकार मारले.
कोहलीने सलग चौथ्या सामन्यात अर्धशतक ठोकले.
कोहलीने 45 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 65 धावा केल्या.
के.एल. राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळवत मालिका खिशात घातली.
= liveblogState.currentOffset ? 'center_block hidden' : 'center_block'">
Continues below advertisement
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : यशस्वी जैस्वालचा धमाका, ठोकले शतक! यशस्वी जैस्वालने त्याचे पहिले एकदिवसीय शतक झळकावले.
दुसऱ्या विकेटसाठी कोहलीसोबत त्याने 60+ धावांची भागीदारी केली आहे.
त्याआधी रोहित आणि यशस्वी जैस्वाल याने 155 धावांची सलामी भागीदारी केली होती.
रोहितने 73 चेंडूत 75 धावा काढत बाद झाला, ज्यामध्ये सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
टीम इंडियाला जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे, आणि हातात अजून 9 विकेट्स आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : रोहित शर्माचं शतक हुकलं, इतक्या धावांवर झाला OUT! तुफानी सुरुवातनंतर टीम इंडियाला पहिला धक्का केशव महाराजने रोहित शर्माला बाद करून भारताला पहिला धक्का दिला.
रोहित आणि यशस्वी जैस्वाल याने 155 धावांची सलामी भागीदारी केली होती, जी महाराजने मोडली.
रोहितने 73 चेंडूत 75 धावा काढत बाद झाला, ज्यामध्ये सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
= liveblogState.currentOffset ? 'center_block hidden' : 'center_block'">
Continues below advertisement
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : यशस्वीचं पहिले अर्धशतक यशस्वी जैस्वालने 75 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या.
हे त्याचा पहिला एकदिवसीय अर्धशतक आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील दोन सामन्यांमध्ये यशस्वी स्वस्तात बाद झाला होता.
यशस्वी सध्या 59 धावांवर आहे, तर रोहित 69 धावांवर आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : रोहितची फटकेबाजी; दमदार अर्धशतकाने मैदान गाजवलं, टीम इंडियाची धावसंख्या 100 पार रोहित शर्माने 54 चेंडूत त्याचे 61 वे अर्धशतक पूर्ण केले.
चालू मालिकेतील हे त्याचे दुसरे अर्धशतक होते.
हिटमॅनने यशस्वी जैस्वालसोबत आधीच 100 पेक्षा जास्त धावांची सलामी भागीदारी केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : दक्षिण आफ्रिका ऑलआऊट! भारतासमोर 271 धावांचे लक्ष्य, कुलदीप अन् प्रसिद्धने मारला विकेट्सचा 'चौकार' भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामना विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला फक्त 270 धावा करता आल्या.
एकेकाळी दक्षिण आफ्रिकेची 2 बाद 168 धावा होत्या. क्विंटन डी कॉकनेही 106 धावांचे विक्रमी शतक झळकावले होते, परंतु संघ 260 धावांवरच आऊट झाला.
भारताकडून कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली.
चायनामन फिरकी गोलंदाजाने 10 षटकांत फक्त 41 धावा देत चार महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, ज्यात एक मेडनचा समावेश होता.
प्रसिद्ध कृष्णानेही चार विकेट्स घेतल्या.
एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला आता 271 धावा कराव्या लागतील.
पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे, त्यावरून टीम इंडिया मालिका जिंकेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : षटकार मारत क्विंटन डी कॉकने ठोकले शतक; डेवाल्ड ब्रेव्हिससोबत क्रीजवर, 31 षटकानंतर दक्षिण आफ्रिकेच्या किती धावा? भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्विंटन डी कॉकने शतक झळकावले.
डी कॉकचे भारताविरुद्धचे हे सातवे एकदिवसीय शतक आहे, ज्यामुळे तो एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारा यष्टीरक्षक-फलंदाज बनला आहे.
भारताला आतापर्यंत चार यश मिळाले आहेत.
यापूर्वी प्रसिद्ध कृष्णाने मॅथ्यू ब्रिट्झके आणि एडेन मार्कराम यांना बाद केले होते.
ब्रिट्झके 24 आणि मार्कराम एका धावेवर बाद झाले.
31 षटकानंतर दक्षिण आफ्रिकेच्या 188 धावा झाल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : डी कॉक आणि बावुमाची जोडी रंगात! टीम इंडिया विकेटच्या शोधात, दक्षिण आफ्रिकाने 16 षटकात केल्या 86 धावा भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्विंटन डी कॉकने अर्धशतक झळकावले आहे.
डी कॉक आणि बावुमा यांनी आधीच 80 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे.
ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 16 षटकात 1 बाद 86 धावांपर्यंत मजल मारता आली.
टीम इंडिया विकेटच्या शोधात आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : पहिल्या षटकात अर्शदीप सिंगने द.आफ्रिकेला दिला मोठा धक्का! रायन रिकेलटन शून्यावर OUT, जाणून घ्या अपडेट्स अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला.
त्याने रायन रिकेलटनला बाद केले, जो कोणताही धावा न करता बाद झाला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : भारतीय संघाची प्लेइंग-11 रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग-11 रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रिट्झके, एडेन मार्कराम, देवाल्ड ब्रेव्हिस, मार्को जॅन्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एनगिडी, ओटेनिल बार्टमन.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : KL राहुलचा मोठा निर्णय या सामन्यासाठी भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला.
वॉशिंग्टन सुंदरच्या जागी तिलक वर्माला संघात घेतला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : दक्षिण आफ्रिकेनेही दोन बदल केले दक्षिण आफ्रिकेनेही दोन बदल केले, ज्यामध्ये रिकलेटन आणि बार्टमन परतले.
टेम्बा बावुमा यांनी घोषणा केली की डी जॉर्जी आणि नंद्रे बर्गर काही आठवड्यांसाठी संघाबाहेर आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : अखेर टीम इंडियाने नाणेफेक जिंकली! टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला; रोहित-विराट बदला घेणार? दक्षिण आफ्रिकेनं भारताला वनडे मालिकेपूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत 2-0 असं पराभूत केलं होतं.
भारतीय संघ वनडे मालिकेत परतफेड करेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
भारतीय चाहत्यांचा अपेक्षा आता तिसऱ्या वनडेतील विजयानं पूर्ण होतात का ते पाहावं लागेल.
दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समान संधी आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : भारताचा संभाव्य संघ यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : दक्षिण आफ्रिका संभाव्य संघ एडन मारक्रम, क्विंटन डिकॉक, टेम्बा बावुमा, मॅथ्यू ब्रीत्सके, रेयान रिकल्टन, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यानसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, ऑटनील बार्टमॅन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : थोड्याच वेळात नाणेफेक, जाणून घ्या सर्वकाही हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होईल. त्याआधी 1 वाजता नाणेफेक होईल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 3rd ODI Live Score : विशाखापट्टणममधील एसीए-वीडीसीए स्टेडियममध्ये रंगणार सामना! भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज विशाखापट्टणममधील एसीए-वीडीसीए स्टेडियममध्ये रंगणार आहे.