India vs South Africa, 2nd T20I Toss Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी20 सामना सुरू झाला आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडिया सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. आजचा सामना न्यू चंदीगड मुल्लांपुर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याची सुरुवात सात वाजता होणार आहे. कटकमध्ये खेळलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 101 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे आफ्रिका पहिल्या पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीत असेल, तर भारताची नजर विजयाची लय कायम ठेवण्यावर असेल.
नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. म्हणजे संजू सॅमसन पुन्हा बाहेर बसणार आहे. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले.
दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग इलेव्हन : रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅनसेन, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
हेड-टू-हेड सामन्यांच्या रेकॉर्डमध्ये कोणाचा वरचष्मा आहे?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 सामन्यांच्या हेड-टू-हेड सामन्यांच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर, त्यांनी आतापर्यंत 32 सामने खेळले आहेत. या काळात टीम इंडियाने 19 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने 12 वेळा विजय मिळवला आहे. शिवाय, एक सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या गेल्या सात टी-20 सामन्यांपैकी सहा सामने भारताने जिंकले आहेत.
सामना कोण जिंकणार?
आपल्या प्रेडिक्शन मीटरनुसार या सामन्यातही टीम इंडियाची जिंकण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, या वेळेस दक्षिण आफ्रिका जोरदार टक्कर देऊ शकते. सामना अंदाजे 60-40 असा झुकलेला दिसतो. दक्षिण आफ्रिकेकडे अनेक मॅच विनर खेळाडू असल्याने ते सोप्पं होणार नाही. पण भारतीय फिरकीपटूंना खेळणं कोणत्याही संघासाठी नेहमीच आव्हानात्मक ठरतं. त्यामुळे हा सामना देखील भारत जिंकण्याची दाट शक्यता आहे.
द. अफ्रिकेला गोलंदाजीपेक्षा फलंदाजांची जास्त चिंता
पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पूर्णपणे ढासळली. दक्षिण अफ्रिकेच्या संघाला गोलंदाजीपेक्षा फलंदाजांची जास्त चिंता आहे. अॅडम मारक्रम, डेव्हीड मिलर आणि ब्रेव्हिससारखे खेळाडू यावेळी जबाबदारीने खेळण्याचा प्रयत्न करतील. दक्षिण अफ्रिकेच्या संघाकडून कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाहीत, परंतु फलंदाजीच्या क्रमात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे ही वाचा -