IND vs PAK R Premadasa Stadium Weather Updates : टी-20 विश्वचषक 2026 च्या सामन्याभोवतीचा उत्साह कदाचित अलिकडच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील इतर कोणत्याही सामन्यापेक्षा जास्त असेल. याचे एक कारण म्हणजे अलिकडचा वाद, जिथे पाकिस्तानने काही दिवसांसाठी या सामन्यावर बहिष्कार टाकला होता, परंतु नंतर यू-टर्न घेतला आणि खेळण्यास सहमती दर्शविली. शिवाय, आशिया कप 2025 दरम्यान निर्माण झालेल्या गोंधळामुळे, यावेळी वातावरण तितकेच तापलेले राहील का याबद्दल उत्सुकता वाढत आहे. मात्र या साऱ्या उत्सुकतेवर पावसाचे सावट दाटले आहे. कोलंबोमध्ये त्या दिवशी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून हवामान खात्याने सतर्कतेचा इशाराही दिला आहे.

Continues below advertisement

सामन्याच्या संध्याकाळी पावसाची शक्यता (IND vs PAK match likely to rain)

रविवार 15 फेब्रुवारी रोजी ग्रुप-ए मधील भारत–पाकिस्तान सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. पण श्रीलंकेच्या हवामान विभागाने दक्षिण-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Continues below advertisement

सरकारी निवेदनात थेट पावसाचा उल्लेख नसला तरी विविध हवामान संकेतस्थळांनुसार संध्याकाळी 6 ते 8 वाजण्याच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. जर पाऊस झाला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर तो रद्द करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल.सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा?

IND vs PAK सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा? (Who benefits if the IND vs PAK match is cancelled?)

सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे 4-4 गुण आहेत. सामना रद्द झाल्यास दोघांचे 5-5 गुण होतील आणि दोन्ही संघ सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरतील. या दृष्टीने पाहता, सामना रद्द होणे दोघांसाठीही फायदेशीर ठरेल.

पण याचा सर्वात मोठा तोटा अमेरिका आणि नेदरलँड्सला होईल. या दोन्ही संघांचे सध्या 2-2 गुण आहेत आणि प्रत्येकी एक सामना बाकी आहे. त्यांनी तो जिंकला तरी त्यांचे गुण 4 होतील, जे भारत-पाकिस्तानच्या संभाव्य 5 गुणांपेक्षा कमी असतील. त्यामुळे त्यांची सुपर-8मध्ये पोहोचण्याची शक्यता संपुष्टात येईल.

सामना झाला तर समीकरण काय? (What is the IND vs PAK match equation?)

जर सामना झाला आणि निकाल लागला, तर विजेता संघ थेट पुढील फेरीत जाईल. पराभूत संघाला मात्र अमेरिका आणि नेदरलँड्सच्या निकालांवर लक्ष ठेवावे लागेल. नेदरलँड्सचा शेवटचा सामना भारताविरुद्ध आहे, त्यामुळे त्यांची वाट कठीण दिसते. अमेरिका मात्र नामिबियाविरुद्ध खेळणार आहे, आणि नामिबिया अजून एकही सामना जिंकलेली नाही.

जर भारताने पाकिस्तानला हरवले आणि नंतर एखाद्या उलटफेरीत नामिबियाने पाकिस्तानला पराभूत केले, तर अमेरिकेला पुढे जाण्याची संधी निर्माण होऊ शकते. विशेषतः जर त्यांनी आपला शेवटचा सामना जिंकला. 

हे ही वाचा -

T20 World Cup Points Table 2026 : मोठी उलथापालथ! छोट्या संघांची सरशी, बड्या संघांची मस्ती जिरली; पॉइंट्स टेबल बघून सगळेच चक्रावले