एक्स्प्लोर

Ind vs Pak :भारताविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, वकार युनूस यांनी सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, उस्मान तारिकबाबत म्हणाले....     

IND vs PAK : भारतानं पाकिस्तानचा टी 20 वर्ल्ड कपमध्ये 61 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघावर टीका केली जात आहे.

IND vs PAK नवी दिल्ली: पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस यांनी पाकिस्तानच्या पराभवावर भाष्य केलं आहे. भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर 61 धावंनी विजय मिळवला. याबद्दल बोलताना वकार युनूस यांनी म्हटलं की सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 175 धावा केल्या तिथंच पाकिस्तानचा संघ मॅचबाहेर गेला होता. वकार युनूस स्टार स्पोर्टस सोबत बोलत होते. ते म्हणाले की , पाकिस्ताननं पहिल्या डावात मॅच गमावली होती. भारतानं जेव्हा 175 धावा केल्या तेव्हाच पाकिस्तानच्या हातून मॅच गेली होती, असंही त्यांनी म्हटलं.

IND vs PAK : सूर्याचं कौतुक, पाकचं काय चुकलं ते सांगितलं

वकार युनूस पुढं म्हणाले की, बॉल स्पिन होत होता सूर्यकुमार यादव यानं गोलंदाजीत समजतूदारपणा दाखवत योग्य बदल केले. पाकिस्ताननं त्यांच्या फिरकी गोलंदाजांचा योग्य प्रकारे वापर केला नाही. भारतानं फिरकी गोलंदाजांचा वापर चांगल्या प्रकारे केल्याचं देखील वकार युनूस म्हणाले. मात्र, मॅच पहिल्याच डावात संपली होती, कारण भारतानं खूप अधिक धावा केल्या होत्या. आपल्या सर्वांना माहिती आहे, पाकिस्तानची फलंदाजी चांगली नाही. भारतानं जर 175 ऐवजी 140 ते 150 धावा केल्या असत्या तर स्थिती वेगळी असती, असं वकार युनूस म्हणाले.    

भारताचा सलामीवीर ईशान किशन यानं 40 बॉलमध्ये 77  धावांची खेळी केली.मधल्या फळीतील फंलदाजांनी योग्य कामगिरी केल्यानं भारतानं मोठी धावसंख्या केली. यानंतर पाकिस्तानचा संघ 18 ओव्हरमध्ये 114  धावांवर बाद झाला. वकार युनूस याबद्दल बोलताना म्हणाले की सूर्यकुमार यादवनं हार्दिक पांड्याला सुरुवातीला गोलंदाजी दिली. जसप्रीत बुमरहानं नेहमीप्रमाणं स्टम्प टार्गेट करत गोलंदाजी करत स्विंग आणि सीम करत चांगली कामगिरी केली. यानंतर पाकिस्तानसाठी स्थिती खराब झाली. सलमान अली अगानं उस्मान तारिकला लवकर गोलंदाजी न देता स्थिती आणखी अवघड केल्याचं वकार युनूस म्हणाले.  

उस्मान तारिकनं चांगली कामगिरी केली, एक विकेट घेतली आणि 24 धावा दिल्या. आम्ही अनेक दिवसांपासून त्याबाबत बोलत होतो. मात्र, बराच वेळ त्याला गोलंदाजी देण्यात आली नाही. जेव्हा त्याला गोलंदाजी मिळाली तोपर्यंत ईशान किशननं त्याचं काम केलं होतं. यावेळीच पाकिस्तानच्या हातून मॅच निसटली होती.  

सुनील गावस्कर यांच्याकडून सूर्याचं कौतुक

दरम्यान, भारताचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी सूर्यकुमार यादवनं परिस्थिती पाहून खेळल्याबद्दल कौतुक केलं. सूर्यकुमार यादवनं पुढं राहून नेतृत्व केलं आहे. अमेरिकेविरोधात भारतानं जेव्हा 77  धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या, संकटाची स्थिती होती तेव्हा सूर्यकुमार यादवनं टीमला संकटातून बाहेर काढलं.पाकिस्तान विरुद्ध सूर्या फलंदाजीला आला तेव्हा 88  धावांवर भारतानं 2 विकेट गमावल्या होत्या, तिथून त्यानं 19 व्या ओव्हरपर्यंत फलंदाजी करत 32  धावा केल्या. सूर्यकुमार यादवनं चांगल्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या नसल्या तरी एका बाजूनं तो मैदानावर उभा राहिला आणि विकेट पडू दिल्या नाहीत,असंही सुनील गावस्कर म्हणाले.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir On MS Dhoni : MS धोनी बोलला, कोच साहेब, कधी तरी तुमच्या चेहऱ्यावर...; आता गौतम गंभीरचा रिप्लाय, म्हणाला, तुला पाहून...
MS धोनी बोलला, कोच साहेब, कधी तरी तुमच्या चेहऱ्यावर...; आता गौतम गंभीरचा रिप्लाय, म्हणाला, तुला पाहून...
Shoaib Akhtar On Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : 2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
Rohit Sharma And Ritika Sajdeh Video Ind vs NZ Final: रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: वेस्ट इंडिज, इंग्लंड, मग फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Embed widget